Do you wanna partner Trailer released
मुंबई - प्राईम व्हिडिओने हिंदी ओरिजिनल कॉमेडी-ड्रामा सीरीज ‘डू यू वाना पार्टनर’चा ट्रेलर रिलीज केला आहे. ही मालिका धर्मटिक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार करण्यात आली आहे. या सीरीजचे निर्माते करण जोहर, अदार पूनावाला आणि अपूर्व मेहता आहेत. शोमेन मिश्रा आणि अर्चित कुमार कार्यकारी निर्माते आहेत.
दिग्दर्शन कॉलिन डी कुन्हा आणि अर्चित कुमार यांनी केले आहे. पटकथा नंदिनी गुप्ता, आर्ष वोरा आणि मिथुन गांगोपाध्याय यांनी लिहिली आहे. तर संकल्पना मिथुन गांगोपाध्याय आणि निशांत नायक यांची आहे.
‘डू यू वाना पार्टनर’चा प्रीमियर १२ सप्टेंबर रोजी भारतासह २४० पेक्षा अधिक देशांमध्ये प्राईम व्हिडिओवर केला जाणार आहे.
सीरीजच्या ट्रेलरची सुरुवात उत्साहवर्धक होते. आपल्या दोन जिवलग मैत्रिणी – शिखा (तमन्ना भाटिया) आणि अनाहिता (डायना पेंटी) यांच्या आयुष्याची झलक दाखवतो. या दोघींना मिळून स्वतःचा क्राफ्ट बिअर ब्रँड सुरू करायचं असतो आणि ते स्टार्टअप जगतात पाऊल टाकतात. त्यानंतर बीअर उद्योगातील दिग्गज, माफिया समोर येतात, ज्याची कल्पनाही त्यांनी केलेली नसते. या सीरीजमध्ये दोन्ही अभिनेत्री मैत्रीणी असतात, ज्या तमाम अडचणींचा सामना करत स्टार्टअप सुरू करतात.
वेब सीरीज डू यू वाना पार्टनरच्या ट्रेलर लॉन्चवेळी तमन्ना भाटिया आणि डायना पेंटीचा लूक गॉर्जियस दिसला. बॅकलेस ड्रेसमध्ये तमन्ना तर डायना पेंटीचा बार्बी डॉल लूक कॅमेराबद्ध झाला.
लॉन्ग फिटेड ड्रेसमध्ये तमन्ना तर बॉल गाऊनमध्ये डायना बार्बी डॉलसारखीच दिसत होती. या लूकचे फोटोज त्यांनी सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत. डायना पेंटीने सॉफ्ट पिंक कलरचा टुले ड्रेस परिधान केला होता. हॉल्टर नेक आणि कॉर्सेट डिझाईन सोबत मिडी ड्रेसची खासियत वॉल्यूमनाईज स्कर्ट आहे, जे डायनाला शोभून दिसत होते. हा ड्रेस डिझायनर गौरी अँड नयनिकाच्या कलेक्शनमधून घेण्यात आले आहे.
डायनाने सॉफ्ट पिंक कलरचा ब्राईट लूक देण्यासाठी मरून शेडची लिपस्टिक कॅरी केली होती. तर पिंक ग्लॉसी लिप्स आणि सॉफ्ट विंग्ड आयलायनर आणि पिंक ब्लश सोबतच केसांचे वेवी स्टाईल केले होते.