Dhurandhar The Revenge Advanced Booking updates  x account
मनोरंजन

Dhurandhar The Revenge Advanced Booking | रिलीज आधीच तिकिटांची धडाधड विक्री! २४ तासात धुरंधर-२ ची कोटींची कमाई

Dhurandhar The Revenge Advanced Booking | रिलीज आधीच तिकिटांची धडाधड विक्री! २४ तासात धुरंधर-२ ची कोटींची कमाई

स्वालिया न. शिकलगार

आगामी चित्रपट Dhurandhar: The Revenge रिलीज होण्याआधीच चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून पहिल्याच 24 तासांत कोटींच्या घरात कमाई झाल्याचे समोर आले आहे. तिकिटांची वेगाने विक्री होत असल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dhurandhar 2 Advance Box Office Collection

आगामी चित्रपट धुरंधर द रेवेंज (Dhurandhar: The Revenge) सध्या रिलीजपूर्वीच चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच या चित्रपटाने कोटींच्या घरात कमाई केल्याचे सांगितले जात आहे.

सिनेमागृहांमध्ये चित्रपट रिलीज होण्यास अजून वेळ असला तरी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. त्यामुळेच ऑनलाइन तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्मवर ‘धुरंधर : द रिव्हेंज’च्या तिकिटांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. अनेक शहरांमध्ये पहिल्या दिवसाच्या अनेक शोसाठी तिकिटांची धडाधड विक्री होताना दिसतेय.

चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलरच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता वाढली. विशेषतः ॲक्शन आणि थरारक स्टोरी प्लॉटमुळे या चित्रपटाची मोठी चर्चा आहे.

धुरंधर २ ॲडव्हान्स तिकिट बुकिंग

धुरंधर २ चित्रपट १९ मार्चला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. तत्पुर्वीच ॲडव्हान्स बुकिंग ट्रेलर रिलीज सोबत सुरु झाले होते. चित्रपटाने २ तासात तगडी कमाई केली. २४ तासात ॲडव्हान्स तिकीट विक्री करून कोटींची कमाई केलीय. चित्रपटाचे ॲडव्हान्स ओपनिंग जवान आणि पठानला देखील मागे टाकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, भारतात धुरंधर २ ला ६ हजार ८४४ शोज मिळाले आहेत. तिकीट विक्री आतापर्यंत १ लाख २० हजारांच्या जवळपास पोहोचले आहे. ११ दिवसांच्याआधीची कमाई १३.९६ कोटी रुपये झालीय. आतापासून धुरंधर २ ची क्रेझ सिनेप्रेमींमध्ये दिसतेय.

मूळचा धुरंधर चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला होता. १३०० कोटींची कमाई केलेलया या चित्रपटाचा रेकॉर्ड धुरंधर-२ मोडेल, असा अंदाज लावला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT