Dhurandhar Rahul Gandhi Pudhari
मनोरंजन

Dhurandhar Rahul Gandhi: 'धुरंधर'मध्ये राहुल गांधी? सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू, काय आहे प्रकरण?

Dhurandhar Rahul Gandhi: धुरंधर ओटीटीवर आल्यानंतर क्रेडिट्समध्ये “राहुल गांधी” हे नाव दिसताच सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. अनेकांना वाटलं की हे काँग्रेस नेते राहुल गांधी आहेत, पण प्रत्यक्षात ते चित्रपटातील एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आहेत.

Rahul Shelke

Dhurandhar Rahul Gandhi: ओटीटीवर धुरंधर प्रदर्शित होताच वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. कारण आहे क्रेडिट्समध्ये झळकलेलं राहुल गांधी हे नाव. चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन आणि रणवीर सिंगचा नवा लूक बाजूला राहिला आणि सोशल मीडियावर एकच प्रश्न विचारला जाऊ लागला की, काँग्रेस नेते राहुल गांधी आता बॉलिवूडमध्ये आले आहेत का?

एक्स (पूर्वीचं ट्विटर) आणि इंस्टाग्रामवर मीम्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी गुगलवर “राहुल गांधी प्रोड्युसर” असं शोधायला सुरुवात केली आहे. काहींनी तर थेट राजकारण आणि बॉलिवूडच्या कामाची चर्चा सुरू केली आहे.

सत्य काय आहे?

जर तुम्हालाही वाटत असेल की, हे नाव काँग्रेस नेते राहुल गांधी यांचंच आहे, तर थोडं थांबा. खरं तर, धुरंधर मधील राहुल गांधी हे काँग्रेस नेते नाहीत. ते चित्रपटसृष्टीतील अनुभवी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आहेत. फक्त नाव सेम असल्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाला आहे.

एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणजे नेमकं काय?

अनेकांना “प्रोड्यूसर” आणि “एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर” यातला फरक माहीत नसतो.
प्रोड्यूसर चित्रपटासाठी पैसा गुंतवतो आणि संपूर्ण प्रोजेक्टची जबाबदारी घेतो. तर एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसरचा रोल वेगळा असतो. बजेट मॅनेज करणे, शूटिंग शेड्युल पाहणे, कलाकारांची व्यवस्था, सेटवरील काम सुरळीत चालतेय ना हे पाहणे अशी महत्त्वाची जबाबदारी त्याच्याकडे असते. ते थेट गुंतवणूक करत नाहीत, तर प्रोड्यूसरकडून मानधन घेऊन प्रोजेक्ट सांभाळतात.

ओटीटीवरील अनेक हिट प्रोजेक्ट्सचा भाग

धुरंधर मधील राहुल गांधी हे इंडस्ट्रीत नवीन नाहीत. याआधीही त्यांनी अनेक लोकप्रिय वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ओटीटी पाहणाऱ्यांना द फॅमिली मॅन, फर्जी, रॉकेट बॉयज, मुंबई डायरीज अशा प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी काम केलं आहे. थोडक्यात सांगायचं तर, धुरंधर मधील राहुल गांधी हे राजकारणी नाहीत तर कॅमेऱ्यामागे मेहनत करणारे फिल्म इंडस्ट्रीतील एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT