'धुरंधर'मध्ये 'त्‍या' दृश्यासाठी लगावली ७ वेळा कानशिलात, तक्रारीऐवजी मारली तिला मिठी; अक्षय खन्नाचा किस्सा...ि File Photo
मनोरंजन

'धुरंधर'मध्ये 'त्‍या' दृश्यासाठी लगावली ७ वेळा कानशिलात, तक्रारीऐवजी मारली तिला मिठी; अक्षय खन्नाचा किस्सा..

धुरंधर चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घालत आहे.

निलेश पोतदार

dhurandhar saumya tandon slapped akshaye khanna 7 times aditya dhar naveen kaushik

पुढारी ऑनलाईन :

धुरंधर चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घालत आहे. या चित्रपटातील 'भाभीजी घर पर है' फेम सौम्या टंडनने रहमान डकैतच्या पत्‍नीची भूमिका बजावली आहे. अभिनेता नवीन कौशिकने सांगितले की, या चित्रपटात एक खास सीन होता. ज्यामध्ये अक्षय खन्नाला सात वेळा कानशिलात लगावली आहे.. त्‍या कानशिलात सौम्या टंडनने लगावल्या होत्‍या.

आदित्‍य धरचा धुरंधर सध्या चित्रपटगृहात चांगलाच गाजत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय कुमार यांच्यासोबत राकेश बेदी, गौरव गेरा आणि नवीन कौशिक यांच्यासारख्या अभिनेत्‍यांचाही समावेश आहे. नवीनने यामध्ये डोगाची भूमिका वटवली आहे. याआधी त्‍याने 'रॉकेट सिंह सेल्समन आफ द इयर' आणि 'ये जवानी है दिवानी' या सारख्या चित्रपटात काम केले आहे. या धुरंधरमध्ये नवीनने डोंगा म्हणजेच (अक्षय खन्ना) च्या गँग मधील एका सहकार्याची भूमिका केली आहे. नुकतच या चित्रपटातील एका खास दृष्यावर तो बोलताना म्हणाला की, एका दृष्यात अक्षय खन्ना यांना ७ वेळा कानशिलात मारल्या आहेत.

चित्रपटात 'भाभीजी घर पर है' फेम सौम्या टंडनने रहमान डकैतच्या पत्‍नीची भूमिका बजावली आहे. या एका दृष्यात त्‍या दोघांचा मोठा मुलगा मारला जातो. यावेळी रागातून उल्फत आपला पती रहमान डकैतला कानशिलात लगावते असे दाखवले आहे. हा एक जबरदस्त सीन आहे. एका मुलाखतीत नवीन कौशिकने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही किस्से सांगितले.

माझ्या मते अक्षय सर यांना तब्बल ७ वेळा कानशिलात खाव्या लागल्या. तो एक जबरदस्त क्षण होता. उल्फत म्हणजे सौम्या टंडन यांची भूमिका अशा महिलेची आहे जी रहमान डकैतशी जीवापाड प्रेम करते. ती त्‍याची ताकद आहे.

पुढे ते म्हणाले, दुसऱ्या भागात तुम्ही त्‍यांच्याशी जोडलेल्या आणखी काही गोष्टी पाहू शकाल. ती अशी व्यक्ती आहे जी रहमानला सांभाळते. रहमानचे आयुष्य आणि त्‍यांच्या निर्णयांमुळे उल्फतला आपल्या मुलाला गमवावे लागते. त्‍यामुळे कानशिलात मारण्याचा तो क्षण अधिक शक्तीशाली होता.

आदित्‍य सर आणि अक्षय खन्ना यांनी एक असा निर्णय घेतला की, जेंव्हा ती कानशिलात मारेल तेंव्हा रेहमान कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. त्‍यामुळे तो कोणताही प्रतिकार न करता ते स्विकारून तीला अलिंगन देतो. अन तु माझा प्राण आहेस असे म्हणतो. अशा प्रकारच्या पात्राने असे म्हणणे एक मोठी गोष्ट आहे.

सौम्या हा सीन करण्यास कचरत होती

नवीन कौशिक यांनी सांगितले की, हा सीन करताना सौम्या कचरत होती. त्‍यांच्यानुसार भारतीय चित्रपटात सध्याच्या ट्रेंडमध्ये असे काही पाहण्यात आले आहे की, काही कठोर लोकांच्या आयुष्यातही असे काही सेंन्सेटिव्ह क्षण येतात. अक्षय सर यांना ७ वेळा कानशिलात खाव्या लागल्या मात्र ते जराही कचरले नाहीत.

अक्षय खन्ना तिला म्हणाला...

सौम्या या कचरत असल्याचे पाहून अक्षय आणि आदित्‍य सर यांनी त्‍यांना सांगितले की, त्‍या पात्र बना, ती व्यक्ती बनू नका जी एका दुसऱ्या कलाकाराच्या समोर उभी आहे. उल्फत रहमानच्या समोर उभी आहे. ती रहमानला घाबरत नाही. तीच्या मुलाच्या मृत्‍युपुढे तीचे भय छोटे झाले आहे.

नवीन यांनी सांगितले की, या सीनच्या शुटिंगदरम्यान ते स्व:तहा तेथे उपस्थित होते. एकावेळी कानशिलात मारण्यात आली. दुसऱ्यांदा मारण्यात आली. मात्र अक्षय खन्ना आणि सौम्या तोपर्यंत रिटेक घेत होते जोपर्यंत हा सीन परफेक्ट होत नाही. अक्षय खन्ना यांनी एकदाही तक्रार केली नाही. तर आदित्‍य धरही परफेक्ट शॉट घेतल्याशिवाय थांबले नाहीत. या दरम्यान सौम्याने अक्षय खन्ना यांना ७ वेळा थप्पड मारल्या. हा सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भूमिकेबद्दल अक्षय खन्नाच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT