धुरंधर चित्रपटाच्या कार्यक्रमात सारा अर्जुनला स्टेजवर किस केल्याने अभिनेता राकेश बेदी सोशल मीडियावर टीकेचा सामना करत आहेत. या घटनेनंतर त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप झाले असून, आता राकेश बेदींनी या वादावर आपली भूमिका स्पष्ट करत “पाहणाऱ्यांच्या दृष्टिकोनावर सगळं अवलंबून आहे” असे म्हटले आहे.
Dhurandhar Actor Rakesh Bedi sara arjun kiss controversy
बॉलिवूडमध्ये अनेकदा कलाकारांच्या वागणुकीमुळे वाद निर्माण होतात. असाच एक वाद सध्या अभिनेता राकेश बेदी यांच्या विषयी झाला आहे. आगामी धुरंधर चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी अभिनेत्री सारा अर्जुन हिला स्टेजवर किस केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शिवाय फोटोही व्हायरल झाल्यानंतर बेदी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. धुरंधरमध्ये राकेश बेदी आणि सारा अर्जुन वडील आणि मुलीची भूमिका साकारत आहेत.
७१ वर्षीय राकेश बेदी, धुरंधर अभिनेत्री सारा अर्जुनला किस केल्याबद्दल ट्रोल झाले आहेत. ट्रोलर्सनी त्यांच्यावर टीका करायला सुरु केल्यानंतर आता त्यांनी मौन सोडले आहे. या घटनेवर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.
आदित्य धर यांचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट धुरंधरमध्ये, राकेश बेदी यांनी धूर्त राजकारणी जमील जमालीची भूमिका साकारली आहे. २० वर्षीय अभिनेत्री सारा अर्जुन त्यांची मुलगी येलिना जमालीची भूमिका साकारली आहे. दरम्यान, धुरंधरच्या ट्रेलर लाँचच्या वेळी दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये बेदी हे साराला किस केल्याचे दिसते.
यानंतर राकेश बेदी यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. व्हिडिओमध्ये, राकेश साराला भेटण्यासाठी जातात आणि तिला आलिंगन देतात. त्यानंतर ते किस घेतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून त्यामुळे अभिनेते राकेश बेदी ट्रोल झाले. ही घटना घडताच अनेकांनी राकेश बेदी यांना अयोग्य म्हटले आहे. काहींनी हे वागणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
रिपोर्टनुसार, राकेश बेदी यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे. "सारा माझ्यापेक्षा खूप वर्षांनी लहान आहे आणि तिने माझ्या मुलीची भूमिका साकारलीय. आम्ही जेव्हा जेव्हा सेटवर भेटायचो तेव्हा आम्ही एकमेकांना वडील आणि मुलीसारखे आलिंगन देत होतो. आमच्या नाते खूप चांगले आहे. त्याहून अधिक आम्ही चांगले मित्र आहोत.''
ते पुढे म्हणाले, कार्यक्रमाच्या दिवशी तिला त्याच प्रेमाने भेटलो होतो. परंतु, ती घटना पूर्णपणे बदलली. ती इतर कोणत्याही दिवसांसारखीच होती. पण लोकांना एका म्हाताऱ्या माणसाला लहान मुलीबद्दल असलेले प्रेम दिसले नाही. पाहणाऱ्यांच्या नजरेत काहीतरी चूक असेल तर कोणी काय करू शकते?"
राकेश बेदी यांनी उत्तर दिलं की, "मी वाईट हेतूने तिचे किस का घेईन? तेही स्टेजवर सर्वांसमोर. तिचे पालक तिथे होते. लोक असे दावे करणारे वेडे आहेत. हा मुर्खपणा आहे. ते फक्त सोशल मीडियावर वाद निर्माण करू शकतात.