‘धुरंधर 2’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरुवात करत विक्रमी कमाई केली आहे. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जोरदार अॅडव्हान्स बुकिंगमुळे चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीतील सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन करणाऱ्या चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. यामुळे आगामी दिवसांतही या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रणवीर सिंहच्या ‘धुरंधर द रिवेंज’ने पहिल्या दिवशी छप्परफाड कमाई केली आहे. 'धुरंधर-२'ने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत आणि ओपनिंग डेलाच १०२.५ कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत हिंदी चित्रपटांत सर्वाधिक कमाई करणारा (ओपनिंग डे) हा चित्रपट ठरला आहे. मीडियी रिपोर्टनुसार, चित्रपटाने भारतात एकूण १४५.५५ कोटी रुपयांची (नेट) कमाई केली आहे. ज्यामध्ये ४३ कोटी रुपये प्रीव्यू शोतून कमाई झालीय. तर असा अंदाज लावला जात आहे पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ऐतिहासिक ओपनिंग नोंदवत हिंदी सिनेमातील आतापर्यंतच्या अनेक मोठ्या विक्रमांना मागे टाकले आहे.
या चित्रपटात मुख्य भूमिकेत रणवीर सिंह असून, त्याच्या दमदार अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अॅक्शन, ड्रामा, डायलॉग्जमुळे चित्रपटाची रिलीजपूर्वीच प्रचंड चर्चा होती. आता कमाईच्या बाबतीत त्याचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसून आला आहे.
या चित्रपटाने ओपनिंग डे कलेक्शनमध्ये जवान, पठान, पुष्पा २ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग डे ठरला आहे.
पहिल्या दिवसाची कमाई
रिपोर्ट्सनुसार, ‘धुरंधर २’ने भारतात पहिल्याच दिवशी १४.५५ कोटींहून अधिक नेट कलेक्शन केलं आहे. यामध्ये प्रीव्यू शोजची कमाई देखील समाविष्ट आहे. (४३ कोटी). तर वर्ल्डवाइड कलेक्शनने २०० कोटींचा टप्पा पार करत २३६.६३ कोटी कमावल्याचं सांगितलं जात आहे.
प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद
चित्रपटाला मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन दोन्हीकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच चित्रपटाने मोठी कमाई केली होती. रिलीजच्या दिवशी अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल शो पाहायला मिळाले.
पहिल्याच दिवशी इतकी मोठी कमाई केल्यानंतर ‘धुरंधर 2’ आता विकेंडमध्ये आणखी मोठा आकडा गाठेल, अशी शक्यता आहे. जर हा ट्रेंड कायम राहिला, तर हा चित्रपट काही दिवसांतच ५०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.