Dhurandhar 2 Controversy pudhari
मनोरंजन

Dhurandhar 2 Controversy: धुरंधर २ चित्रपटामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात? दिल्ली उच्च न्यायालयाने चौकशीचे दिले आदेश, नेमकं प्रकरण काय?

Anirudha Sankpal

dhurandhar controversy delhi high court orders: भारतीय लष्करातील एका कर्मचाऱ्याने धुरंदर 2 चित्रपटात लष्करी आणि गुप्तचर विभागाची काही संवेदनशील माहिती उघड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याच्या सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला या आरोपांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.

कोणी केली होती याचिका

देवेंद्र कुमार उपाध्याय आणि जस्टीस तेजस करिया या डिव्हिजन बेंचने याचिकाकर्त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच सीबीएफसीसमोर त्यांचे सादरीकरण करण्यास सांगितलं आहे. या याचिकेत व्यक्त केलेली शंका संबंधित प्रशासनानं तपासाव्यात असे देखील आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबतची माहिती एएनआयने दिली आहे.

ही याचिका दीपक कुमार यांनी दाखल केली होती. ते सशस्त्र सीमा बल (SSB) चे कर्मचारी आहेत. त्यांनी वकील जगजीत सिंह यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सध्या याचिकाकर्ता हा दिल्लीतील आरके पुरम येथील एसएसबी हेडक्वार्टरमध्ये तैनात आहे असं सांगण्यात आलं आहे.

अंडर कव्हर एजंटचा जीव धोक्यात?

याचिकाकर्त्याची बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या मते त्यांनी २३ मार्च २०२६ रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सीबीएफसीला आधीच आपले सादरीकरण पाठवलं आहे. त्यांनी चित्रपटाविषयी आक्षेप नोंदवला आहे. रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटातील काही सीन हे ऑपरेशनल मेथर्ड, टॅक्टिकल प्रोसिजर आणि गुप्तचर विभागासंदर्भातील अॅक्टिव्हिटी अशा प्रकारे दाखवल्या आहेत की ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि अंडर कव्हर एजंट्सचा जीव धोक्यात आला आहे.

या याचिकेमध्ये दावा करण्यात आला आहे की या चित्रपटात काही विशिष्ट लोकेशन आणि अॅक्शन सीन हे हुबेहूब खऱ्या आयुष्यातील लष्करी आणि गुप्तचर ऑपरेशन्ससारखे आहेत. याचिकाकर्त्यांच्या मते यामुळे विरोधी एजन्सींना भारतीय सैन्याच्या ऑपरेशन पॅटर्नची माहिती मिळत आहे.

सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने जरी चित्रपट हा काल्पनिक कथेवर आधारीत असला आणि फक्त मोनरंजनाच्या उद्येशाने बनवण्यात आला असला तरी अशा काही सीन्सचा प्रभाव पूर्णपणे नाकारून चालणार नाही असे निरीक्षण नोंदवले. या बेंचने संबंधित प्रशासनाला या याचिकेची दखल घेत योग्य निर्णय घेण्याचे आदेश देत पीआयएल निकाली काढली. याचबरोबर या याचिकेत स्पाय प्रोटोकॉल मुव्हीसाठी एक मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात यावीत अशी मागणी केली होती. तसेच धुरंधर द रिव्हेंज या चित्रपटाचे स्क्रिनिंग देखील थांबवावे अशी मागणी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT