Dhurandhar 2 Box Office Collection Day 11 instagram
मनोरंजन

Dhurandhar 2 BO Collection Day 11: 'धुरंधर'साठी ११ वा दिवस कसा आहे, रविवारची छप्परफाड कमाई, 'बाहुबली'चे मोडले रेकॉर्ड

Dhurandhar 2 Collection | धुरंधर 2 ने मोडला बाहुबलीचा रेकॉर्ड? ११व्या दिवशी नवा इतिहास

स्वालिया न. शिकलगार

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या ११ व्या दिवशी, म्हणजे दुसऱ्या रविवारी, या चित्रपटाने ६८.१० कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली. यासह चित्रपटाने केवळ त्याच्या पहिल्या भागाचा (धुरंधर १) ८४० कोटींचा रेकॉर्डच मोडला नाही, तर उत्तर अमेरिकेत 'बाहुबली २' चा ९ वर्षांचा विक्रमही मोडीत काढला आहे. सध्या या चित्रपटाचे एकूण जागतिक कलेक्शन १३६० कोटींच्या पार गेले असून, हा चित्रपट २०२६ चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे.

भारतीय सिनेसृष्टीत सध्या एकच नाव गाजत आहे, ते म्हणजे 'धुरंधर २: द रिव्हेंज'. दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या या जोडीने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ आणले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ११ दिवस पूर्ण झाले धुरंदर २ ने तब्बल १३०० कोटी रुपयांची कमाई केलीय. बाहुबली द कन्क्लूजन चित्रपटाचा ९ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे.

रविवारी केली विक्रमी कमाई

'धुरंधर २' ने आपल्या ११ व्या दिवशी म्हणजेच रविवारी अंदाजे ६८.१० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने ६२.८५ कोटींची कमाई केली होती. कौटुंबिक प्रेक्षकांनी थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे या चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीतील 'दुसऱ्या रविवारचा' आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा गाठला आहे.

भारतातील कलेक्शन ८४७.३३ कोटी पोहोचले आहे. इंडिया ग्रॉस कलेक्शन १०१२.४९ कोटी पोहोचले आहे. वर्ल्डवाईड कमाई १३०० कोटींच्या आसपास पोहोचले आहे. धुरंधर आणि धुरंधर २ चे बजेट २५० ते ४०० कोटींचे आहे.

नॉर्थ अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा रेकॉर्ड बाहुबली २ चा होता. त्या चित्रपटाने १९८ कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती. पण आज धुरंधर २ ने २२ मिलियन डॉलरची कमाई करत बाहुबली २ ला मागे टाकले आहे. याशिवाय भारतात या चित्रपटाने 'पुष्पा २', 'जवान' आणि 'पठाण' सारख्या बड्या चित्रपटांच्या दुसऱ्या आठवड्यातील कलेक्शनला मागे टाकले आहे.

एकूण कलेक्शन

ओव्हरसीज मार्केटमध्येही या चित्रपटाची जादू कायम असून तिथे ३५० कोटींची कमाई झाली आहे. अशा प्रकारे 'धुरंधर २' चे जगभरातील एकूण कलेक्शन १३६१.९५ कोटी रुपये झाले असून, हा चित्रपट आता भारताचा चौथा सर्वात मोठा चित्रपट बनण्याच्या मार्गावर आहे.

रणवीर सिंहने साकारलेली 'हमजा' ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरली आहे. संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ४ तासांचा प्रदीर्घ रनटाईम असूनही प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून दाद दिलीय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT