निधनानंतरही धर्मेंद्र यांचा नवा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याचे पोस्टर आऊट झाले आहे. त्यात ही-मॅन अनोख्या भूमिकेत दिसणार असून चाहते भावुक झाले आहेत.
Ikkis Movie Dharmendra look released
पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधना पश्चातही ते एका चित्रपटामध्ये दिसतील. चित्रपटाचे नाव आहे-इक्कीस. निर्मात्यांनी इक्कीस चित्रपटाचे नवे पोस्टर जारी केले आहे. ज्यामध्ये धर्मेंद्र दिसत आहेत. बॉलीवूडचे ही-मॅनचा हा वॉर ड्रामा चित्रपट पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत असेल.
हा चित्रपट श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात धर्मेंद्र यांचीही भूमिका आहे. सोमवारी निर्मात्यांनी इक्कीस चित्रपटाचे नवे पोस्टर जारी केले आहे. या पोस्टरवर धर्मेंद्र दिसत आहेत. ते अगस्त्य नंदाच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतील.
मॅडॉक फिल्म्सने शेअर केले पोस्टर
मॅडॉक फिल्म्सच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर इक्कीस चित्रपटाच्या नव्या पोस्टरची झलक दाखवण्यात आलीय. कॅप्शनमध्ये लिहिलंय - ‘A father’s worst nightmare became a nation’s chance to dream again. “Woh joh na sirf Hindustani, balki Pakistani fauj ke liye bhi misaal ban gaya”
वॉर ड्रामा चित्रपट ‘इक्कीस’मध्ये ते भारताच्या सर्वात कमी वयाचे परम वीर चक्र सन्मानित सेकेंड लेफ्टनेंट अरुण खेत्रपाल यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतील. मागील वेळी धर्मेंद्र रॉकी और रानी की प्रेम कहानी, तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटांमध्ये दिसले होते.