धर्मेंद्र यांच्या अंत्यसंसकारावेळी बॉलिवूडचे दिग्गज, चाहते आणि कुटुंबीय उपस्थित होते. जय-वीरु वेगळे झाले, तर दीपिका-रणवीर, ईशा-सनी देओल स्मशानभूमीत पोहोचले आणि श्रद्धांजली अर्पण केली.
Actor Dharmendra Last Rites celebs reached at Pawan Hans crematorium in Mumbai
मुंबई - बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईतील पवनहंस स्मशानभूमीत अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. त्यांच्या चाहत्यांपासून ते बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपर्यंत सगळ्यांनी शेवटच्या निरोपासाठी गर्दी केली होती. हेमा मालिनी, ईशा देओल, बॉबी देओल, अमिताभ बच्चन, गोविंदा, सलमान खान, अक्षय कुमार, फरहान अख्तर, अजय देवगनसह अनेक बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार अंत्यसंस्कारासाठी पोहोचले.
सिनेमातील ‘जय-वीरु’ जोडी म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र आणि अमिताभ यांचं नाते प्रत्येक चाहत्यांच्या हृदयात ठसलेलं आहे. परंतु धर्मेंद्रच्या अंतिमयात्रेच्या वेळी, सोशल मीडियाच्या माध्यमातून जय-वीरु वेगळे झाले, अशा पोस्ट झळकल्या. अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग, सायरा बानो, आमिर खान, अभिषेक बच्चन, जाएद खान, अनिल कपूर, शाहरुख खान उपस्थित होते. धर्मेंद्र यांची मुले ईशा देओल आणि सनी देओल यांच्या डोळ्यांत अश्रू तराळले होते.
Devil V!SHAL, viralbhayani - video x account and instagram वरून साभार