Tere Ishq Me Teaser  pudhari
मनोरंजन

Tere Ishq Me Teaser Out: धनुष पुन्हा दिसणार सनकी लवरबॉयच्या अवतारात; तेरे इश्क मेचा टीजर समोर

या सिनेमात शंकर आणि मुक्तीची लव्हस्टोरी दिसते आहे

अमृता चौगुले

रांझना सिनेमानंतर धनुष पुन्हा एकदा सनकी लव्हर बॉयच्या भूमिकेत परत आला आहे. त्याचा आगामी तेरे इश्क मेचा टीजर नुकताच समोर आला आहे. या सिनेमात शंकर आणि मुक्तीची लव्हस्टोरी दिसते आहे. (Latest Entertainment News)

काय आहे टीजरमध्ये

टीजरच्या सुरुवातीला भावी नवरीचा हळद समारंभ दिसतो. ज्यात नवरी मुक्ती म्हणजेच कृती आहे. तेवढ्यात समोरून जखमी अवस्थेतील चालत येणारा शंकर म्हणजेच धनुष दिसतो. जो नुकताच वडिलांच्या अंत्यसंस्कार करून आलेला असतो. यावेळी तो तिच्या अंगावर गंगाजल ओतत म्हणतो, नवीन आयुष्य सुरू करते आहेस, जुने पाप तर धुतले जायला हवेत.’ पुढे तो म्हणतो, ‘तुला मुलगाच व्हावा, म्हणजे तुला समजेल प्रेमात मारणारा पण कुणाचा तरी मुलगा असतो.’ या टीजरमध्ये मुक्ती आणि शंकरच्या तीव्र प्रेमाची झलक आणि त्यानंतर होणारा द्वेष आणि सूडाचा प्रवास ठळकपणे दिसून येते आहे.

रांझनामध्ये आणि यात काय साम्य?

रांझनाप्रमाणेच ही गोष्टही बनारसच्या पार्श्वभूमीवर घडते आहे. त्यामुळे याला खास रांझना टच असेल ही शक्यता कमी नाही.

आनंद राय आणि धनुष

हा सिनेमा आनंद राय आणि धनुष या जोडीचा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी हे दोघे रांझना, अतरंगी रे आणि आता तेरे इश्क मे साठी एकत्र आहेत.

या सिनेमाची गाणी इरशाद कामिलने लिहिली आहेत. तर अरिजित सिंगचा जादुई आवाज त्याला आणखी श्रवणीय बनवतो आहे. या सिनेमाची निर्मिती टी-सीरीज, कलर येलो, आनंद एल राय, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि हिमांशु शर्मा यांनी केली आहे.

कधी होणार रिलीज?

हा सिनेमा 28 नोव्हेंबरला रिलीज होतो आहे

दोन भाषांत होणार रिलीज

हा सिनेमा तमिळ आणि हिन्दी अशा सन भाषांत रिलीज होतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT