Bollywood : या चित्रपटात गोविंदा नव्हे, तर माकड होतं हिरो; कलाकारांपेक्षा मिळाली होती जास्त फी file photo
मनोरंजन

Bollywood : या चित्रपटात गोविंदा नव्हे, तर माकड होतं हिरो; कलाकारांपेक्षा मिळाली होती जास्त फी

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक David Dhawan सध्या त्यांच्या आगामी चित्रपट Hai Jawani Toh Ishq Hona Hai मुळे चर्चेत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

devid dhawan movie ankhen monkey fees more then govinda chunky pandey

पुढारी ऑनलाईन :

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक David Dhawan सध्या त्यांच्या आगामी चित्रपट Hai Jawani Toh Ishq Hona Hai मुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या मोठ्या रिलीजपूर्वी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासाचा गौरव करण्यासाठी ‘डेविड धवन फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे.

कॉमेडी चित्रपटांचे बादशाह मानले जाणारे डेविड धवन यांच्या कारकिर्दीचा उत्सव साजरा करण्यासाठी PVR INOX तर्फे २२ मेपासून या फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. यात त्यांच्या सुपरहिट चित्रपटांचे पुन्हा प्रदर्शन करण्यात आले आहे. यात Partner, Mujhse Shaadi Karogi, Raja Babu आणि Aankhen यांचा समावेश आहे. याचदरम्यान ‘आंखें’ चित्रपटाशी संबंधित एक भन्नाट आणि आश्चर्यकारक किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे.

या चित्रपटाचे खरे स्टार Govinda किंवा Chunky Pandey नव्हते, तर एक माकड होते. विशेष म्हणजे त्या माकडाला या दोन्ही अभिनेत्‍यांपेक्षा जास्त मानधन आणि अधिक राजेशाही सुविधा मिळाल्या होत्या.

‘आंखें’ चित्रपटाचा भन्नाट किस्सा

हा मजेशीर खुलासा स्वतः गोविंदा, चंकी पांडे आणि शक्ती कपूर यांनी The Great Indian Kapil Show मध्ये केला होता. शोदरम्यान त्यांनी ‘आंखें’च्या शूटिंगदरम्यानच्या अनेक भन्नाट आठवणी शेअर केल्या.

गोविंदा आणि चंकी पांडे यांनी सांगितले की, सेटवर त्यांच्यापेक्षा त्या माकडालाच जास्त महत्त्व दिले जायचे. त्याची काळजी एखाद्या व्हीआयपी कलाकारासारखी घेतली जात होती.

शक्ती कपूर यांनी गंमतीने सांगितले, “आम्ही एक चित्रपट केला होता ज्यात हे दोघे हिरो होते. पण खरं सांगायचं तर त्या चित्रपटात तीन हिरो होते, गोविंदा, चंकी आणि एक माकड.”

यावर चंकी पांडे हसत म्हणाले, “हो, त्याला आमच्यापेक्षा खूपच जास्त फी मिळाली होती.” त्यावर गोविंदानेही मजेशीर अंदाजात म्हटले, “आम्हाला तर पैसेच मिळाले नाहीत, सगळे पैसे ते माकड घेऊन गेले.”

माकडाचा व्हीआयपी थाट

शक्ती कपूर यांनी पुढे सांगितले की, चित्रपटात काम करणाऱ्या त्या माकडासाठी Sun-n-Sand Hotel या प्रसिद्ध पाचतारांकित हॉटेलमध्ये खास खोली बुक करण्यात आली होती.

त्यांनी सेटवरील एक भन्नाट किस्साही सांगितला. ते म्हणाले, “डेविड धवन जेव्हा सेटवर माकडाला हाक मारायचे, तेव्हा चंकी पांडे धावत यायचे. आणि जेव्हा चंकीला बोलवायचे, तेव्हा माकड समोर येऊन उभे राहायचे.”

याआधी चंकी पांडे यांनी एका मुलाखतीतही या माकडाच्या नखऱ्यांबद्दल सांगितले होते. त्यांनी म्हटले होते, “सुरुवातीला मला सांगण्यात आले की चित्रपटात माझ्याशिवाय सगळ्यांचे डबल रोल आहेत. मी म्हटलं, हे अन्यायकारक आहे. मग निर्मात्यांनी मला पार्टनर म्हणून एक माकड दिलं.”

ते पुढे म्हणाले, “त्या माकडाला माझ्यापेक्षा आणि गोविंदापेक्षाही जास्त पैसे मिळाले होते. ते दक्षिण भारतातून आलेले अतिशय महागडे प्रशिक्षित माकड होते. ते आपल्या सहा सहाय्यकांसह विमानाने मुंबईत आले होते. खऱ्या अर्थाने तो मोठा स्टार होता. सेटवर त्याच्यामुळे अनेक भन्नाट गोष्टी घडायच्या, पण संपूर्ण टीम त्याच्यावर खूप प्रेम करायची.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT