Sameer Wankhede Defamation Case Aryan khan bad of bollywood
मुंबई - आर्यन खानच्या बॅड्स ऑफ बालिवूड सीरीज प्रकरणात माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना दिल्ली हायकोर्टाने कोणताही दिलासा दिला नाही. कोर्टाने आर्यन खानची सीरीज ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ विरुद्ध दाखल केलेल्या २ कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटल्यात त्यांना तात्काळ अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. या प्रकरणी आज शुक्रवारी सुनावणी झाली.
समीर वानखेडे यांच्या वकिलांनी हाईकोर्टाकडे ‘पासओवर’ मागितला आहे. सर्व प्रकारच्या सुनावणीनतर विनंती करण्यासाठी ‘पासऑवर’ मागितला जातो. वानखेडे यांच्या वकिलांनी केस प्रकरणात सुधारणासाठी वेळ मागितला आहे. हायकोर्टाने वकिलांची मागणी स्वीकारली आहे. न्यायमूर्ती म्हमाले, ‘तुम्ही तुमचा अर्ज दाखल करू शकता’. आता पुढील सुनावणीची तारीख सांगितली जाईल.
वानखेडे य़ांनी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्रुझवरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता आर्यनने बॅड्स ऑफ बॉलिवूड या सीरीजमधून दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. या सीरीजमध्ये समीर वानखेडेंशी संबंधित दृश्ये आहेत, त्यानंतर हे सीन्स सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. नेटकऱ्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रियाही दिल्या होत्या.
त्यानंतर समीर वानखेडे यांनी नेटफ्लिक्सच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेबसीरीज विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यांनी नेटफ्लिक्स आणि शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या विरोधात २ कोटींची मानहानीची याचिका दाखल केली. २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती, जी त्यांना कर्करोगाच्या रुग्णांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करायची होती.
वानखेडे यांचे वकील म्हणाले, ही वेब सीरीज दिल्लीसह इतर शहरांसाठी आहे आणि यामध्ये अधिकाऱ्याची बदनामी झाली आहे. याचिकेत म्हटले आहे की, ही सीरीज जाणूनबुजून वानखेडे यांची प्रतिष्ठा पूर्वग्रहदूषित पद्धतीने मलीन करण्याच्या उद्देशाने रचण्यात आली होती आणि अंमलात आणण्यात आली. विशेषतः जेव्हा अधिकारी आणि आर्यन खान यांच्याशी संबंधित खटला मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे आणि न्यायालयीन सुनावणीत आहे.
असाही दावा करण्यात आला आहे की, या सीरीजमध्ये एका पात्राला अश्लील हावभाव करताना दाखवण्यात आले आहे. खासकरून हे पात्र ‘सत्यमेव जयते’ राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान करतो. हे कृत्य अपमानजनक आहे. ज्यामुळे कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते.