Madhuri Dixit workaholic comment deepika padukone hours shift
मुंबई : दीपिका पादुकोणने जेव्हापासून ८ तासांचे काम करण्यावरून वक्तव्य केले आहे, तेव्हापासून चित्रपट इंडस्ट्रीत कामाच्या तासावरून चर्चा सुरु आहे. पण या दरम्यान, माधुरी दीक्षितने असं काही म्हटलं, ज्यावरून ती चर्चेत आली. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिकाने ८ तासांच्या शिफ्टची मागणी केली आहे केली होती, ज्यामुळे तिला 'स्पिरिट' आणि 'कल्कि 2898 एडी' चित्रपटातून बाहेर व्हावं लागलं होतं. त्यानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीत ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीवरून वाद निर्माण झाला. अनेक सेलिब्रिटींना दीपिकाचे सर्मथन केले तर काहींनी विरोध केला. दरम्यान, आता माधुरी दीक्षित यावर काय म्हणाली पाहुया.
मिसेस देशपांडे फेम माधुरी दीक्षितने प्रतिक्रिया देत स्वत:ला वर्कहोलिक म्हटलं आहे. तिच्या या वक्तव्याने मात्र दीपिका पादुकोणचे फॅन्स तिला ट्रोल करू लागले. एका वृत्तसंस्थेशी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाली, जेव्हा आम्ही मिसेस देशपांडे सीरीज केली तेव्हा आम्ही प्रत्येक दिवशी १२ तासंच्या शिफ्टमध्ये काम केले. कधी-कधी त्याहून अधिक. मी एक वर्कहोलिक आहे आणि मला वाटतं की, प्रत्येकाची आपली आवड असते.
माधुरीने हे देखील सांगितलं की, जर एका महिलेत ती पॉवर आहे आणि ती म्हणून शकते की, ती ८ तास काम करू इच्छिते तर ठिक आहे. माधुरी दीक्षितने स्वत:ला वर्कोहोलिक म्हणत सांगितलं की, किती तास काम करायचं, हा तिचा अधिकार आहे आणि तिचं आयुष्य आहे. ती तेच करेल, जसे ती करू इच्छिते. आई झाल्यानंतर देखील तिने दीर्घ शिफ्ट्समध्ये काम केलं आहे. पण, आपल्या मर्जीने काम करण्याचं स्वातंत्र्यही मिळायला हवं, असे तिचे म्हणणे आहे.
दीपिका पादुकोण म्हणाली..
दीपिका पादुकोण ने या वादावर सांगितलं होतं की, एक महिला होण्याच्या नात्याने जर काही जबरदस्ती वा आणखी काही वाटत असेल तर ठिक आहे..पण इंडस्ट्रीमध्ये असे अनेक मेल स्टार्ट आहेत, जे ८ तासांपासून शिफ्ट करत आहेत.
माधुरी दीक्षितला ट्रोल करू लागले दीपिकाचे फॅन्स
हे प्रकरण इथेच थांबले नाही. माधुरीच्या प्रतिक्रियेनंतर दीपिकाचे फॅन्स ट्रोल करू लागले. काही जणांचे म्हणणे होते की, ज्यावेळी माधुरीला आपल्या मुलांना मोठं करायचं होतं, तेव्हा ती इंडस्ट्री पासून दूर गेली होती. पण आथा दीपिकाची मुलगी खूप छोटी आहे. काही अन्य सोशल मीडिया युजर्सनी माधुरीवर निशाणा धरला.
हॅनागेश कुकुनूर द्वारा दिग्दर्शित मिसेस देशपांडे १९ डिसेंबर रोजी जिओ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे, ज्यामध्ये माधुरी दीक्षित दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये की एक सीरियल किलर आहे.