Deepika Padukone Hollywood honor  Instagram
मनोरंजन

Deepika Padukone | दीपिका पदुकोणचे 'हॉलीवूड वॉक ऑफ फेम'वर नाव! सन्मान मिळवणारी पहिली अभिनेत्री

Deepika Padukone | दीपिका पदुकोणचे हॉलीवूड वॉक ऑफ फेमवर नाव! हा सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय कलाकार ठरल्या

स्वालिया न. शिकलगार

Deepika Padukone Hollywood Walk of Fame star

मुंबई - दीपिका पदुकोण केवळ बॉलिवूडमधील सुपरस्टार नाही, तर एक जागतिक स्तरावरील आयकॉन आहे. हॉलीवूड चेंबर ऑफ कॉमर्सकडून तिला प्रतिष्ठित हॉलीवूड वॉक ऑफ फेमवर स्टार प्रदान करण्यात आला आहे. हा मान मिळवणारी ती पहिली भारतीय कलाकार ठरलीय.

दीपिकाचा हा सन्मान एमिली ब्लंट, टिमोथी चालमेट, रामी मालेक, रॅचेल मॅकअ‍ॅडम्स, स्टॅनली टुच्ची, डेमी मूर यांसारख्या आंतरराष्ट्रीय नामवंत कलाकारांसोबत यंदाच्या यादीत त्यांचे नाव घेतले जात आहे.

दीपिकाच्या यशाची यादी दीर्घ आहे. 2018 मध्ये Time Magazine ने तिला जगातील ‘100 Most Influential People’ मध्ये स्थान दिले. त्यानंतर TIME100 Impact Award मिळाला. दीपिका बॉलिवूडमध्येही सक्रिय आहेत. आगामी चित्रपटांमध्ये अनेक मोठ्या बॅनरचे प्रोजेक्ट्सही आहेत. लवकरच ती प्रसिद्ध दिग्दर्शक अ‍ॅटली यांच्या चित्रपटात झळकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT