एकेकाळी टेलिव्हिजनवर गाजलेल्या मालिकांमध्ये दामिनी या मालिकेचे नाव सगळ्यात वर आहे. 1997 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर या मुख्य भूमिकेत होत्या. या मालिकेची पटकथा, कलाकार आणि टायटल साँग याची क्रेझ अजूनही आहे. (Latest Entertainment News)
आता या लोकप्रिय मालिकेचा दुसरा सीझन येऊ घातला आहे. दामिनी 2.0 असे या नव्या मालिकेचे नाव आहे. या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये एका सामाजिक संस्थेच्या संचालिका असलेल्या क्षिति जोग यांची व्यक्तिरेखा दिसते आहे. या मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये क्षिति यांनी इंस्पेक्टर दिव्या खानोलकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. आताच्या सीझनमध्ये अभिनेत्री किरण पावसे ही मुख्य भूमिकेत दिसते आहे.
प्रोमोमध्येच दामिनीप्रमाणेच किरणही अन्यायाविरोधात लढताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता सुबोध भावे दिसतो आहे.
दामिनी 2.0 कधी प्रसारित होणार?
या महिन्याच्या 13 तारखेपासून म्हणजेच 13 ऑक्टोबरपासून ही मालिका प्रसारित होणार आहे.
दामिनी 2.0 मालिकेच्या प्रसारणाची वेळ काय?
ही मालिका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे.
दामिनी 2.0 या मालिकेत कोणते कलाकार दिसणार?
किरण पावसे, सुबोध भावे, क्षिती जोग, ध्रुव दातार हे कलाकार या मालिकेत दिसत आहेत.
दामिनी ही मालिका सह्याद्री या वृत्तवाहिनीवर प्रसारित होत होती. दुपारी साडेचारची वेळ या मालिकेची होती. या मालिकेचा पहिला सीझन 18 वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता.