Consumer Court Compensation: चित्रपटगृहात तिकीट काढून चित्रपट पाहायला गेल्यानंतर प्रेक्षकांना योग्य सुविधा मिळाल्या नाहीत, तर त्यासाठी थिएटर व्यवस्थापनाला जबाबदार धरले जाऊ शकते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हैदराबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका चित्रपटगृहाला प्रेक्षकाला तिकीटाची रक्कम परत करण्यासह 5 हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
हे प्रकरण ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानचे आहे. तक्रारदार असलेल्या एका वकिलाने आपल्या कुटुंबासह चित्रपट पाहण्यासाठी तीन गोल्ड क्लास तिकिटे खरेदी केली होती. या तिकिटांसाठी त्यांनी 525 रुपये मोजले होते. मात्र चित्रपट सुरू झाल्यानंतर थिएटरमधील एअर कूलिंग सिस्टम बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तक्रारदार व्यवसायाने वकील आहेत.
31 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी कुटुंबासह ‘पुष्पा 2’ पाहण्यासाठी तीन गोल्ड क्लास तिकिटे खरेदी केली होती.
तिकिटांसाठी त्यांनी 525 रुपये मोजले होते.
चित्रपट सुरू झाल्यानंतर थिएटरमधील एअर कूलिंग सिस्टम आणि पंखे नसल्याचा आरोप त्यांनी केला.
व्यवस्थापकाकडे तक्रार केली, मात्र कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही.
थिएटर व्यवस्थापनाने एसी बंद असल्याचा आरोप फेटाळला.
कूलिंग प्लांट दिवसभर सुरू असल्याचा दावा केला.
डिसेंबर महिन्यात अनेक प्रेक्षक एसी कमी ठेवण्याची विनंती करतात, असेही सांगितले.
शोला केवळ 57 प्रेक्षक उपस्थित असल्याचा युक्तिवादही केला.
सुनावणीदरम्यान आयोगाने थिएटरच्या स्पष्टीकरणात विसंगती आढळल्याचे नमूद केले.
एकीकडे एसी सुरू होता असे सांगितले गेले.
दुसरीकडे थंडीमुळे कूलिंग कमी ठेवले होते, असा दावा करण्यात आला.
या परस्परविरोधी दाव्यांमुळे प्रेक्षकांना प्रत्यक्ष त्रास झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे आयोगाने म्हटले.
आयोगाने थिएटरला पुढील आदेश दिले आहेत:
तिकीटाची 525 रुपयांची रक्कम परत करणे.
तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून 9 टक्के व्याज देणे.
मानसिक त्रास आणि गैरसोयीबद्दल 3,000 रुपयांची भरपाई देणे.
न्यायालयीन खर्चासाठी 2,000 रुपये देणे.
एकूण 5 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम तक्रारदाराला मिळणार आहे.
थिएटरने 45 दिवसांच्या आत आदेशाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
तसे न केल्यास अतिरिक्त 2,000 रुपयांची भरपाई द्यावी लागेल.