बहुचर्चित ‘कॉकटेल २’ बाबत दिग्दर्शकाने मोठी अपडेट दिली असून, या घोषणेनंतर चित्रपटाशी संबंधित कलाकारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. शाहिद कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांनी या खास क्षणाचा आनंद साजरा केल्याचं बोललं जात असून, चाहत्यांमध्येही चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Shahid Kapoor Rashmika Mandanna Kriti Sanon directed by Homi Adajania
बॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट ‘कॉकटेल’ चा दुसरा भाग म्हणजेच ‘कॉकटेल २’ सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत दिग्दर्शकाने नुकतीच एक महत्त्वाची अपडेट दिली असून, त्यानंतर चित्रपटातील कलाकारांनी कक कापून आनंदोत्सव साजरा केला. शाहिद कपूर, क्रिती सेनॉन आणि रश्मिका मंदान्ना यांनी सेलेब्रेशन केलेले फोटो एक्स अकाऊंटवर व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘कॉकटेल २’ च्या शूटिंगचं काम पूर्ण झालं आहे. यानंतर शाहिद आणि रश्मिका, क्रिती यांनी सेटवर केक कापून सेलिब्रेट केले.
होमी अदजानिया दिग्दर्शित 'कॉकटेल २' यावर्षी २०२६ मध्ये रिलीज केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शाहिद कपूर, रश्मिका मंदाना, क्रिती सेनॉन यांचा बहुप्रतीक्षित चित्रपटाची अधिकृत रिलीज डेटची अधिकृत घोषणा झालेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘कॉकटेल २’मधील रश्मिका मंदान्ना आणि शाहिदची फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. होमी अदजानियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'कॉकटेल २ चे शूटिंग पूर्ण झाले आहे. कदाचित मी पक्षपाती आहे, पण हे थोडे खास वाटते. माझ्या टीम आणि कलाकारांना खूप प्रेम, जे मला आणि माझ्या कृती सहन करतात. तुम्हाला खूप प्रेम.'
सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया
होमी अदजानियाची पोस्ट अनेक सेलिब्रिटींनी पसंत केली आहे. कृती सेनॉनने पोस्टवर लिहिलं, "लव्ह यू, होमस्टर." झोया अख्तरने हार्ट इमोजी शेअर केली.