CBFC demand Son Of Sardaar 2 With Minor Changes
मुंबई - अजय देवगन-मृणाल ठाकुर स्टारर चित्रपट 'सन ऑफ सरदार २' १ ऑगस्ट, २०१५ रोजी रिलीज होईल. २०२१ मध्ये सन ऑफ सरदार रिलीज झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. याच चित्रपटाचा दुसरा भाग सीक्वेल आहे. चित्रपटातील ट्रेलर आणि गाणी हिट ठरली आहेत. दरम्यान, सैयारा आणि महावतार नरसिम्हामुळे 'सन ऑफ सरदार'ला स्क्रीन मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आता एका रिपोर्टनुसार, सीबीएफसीने सन ऑफ सरदार २ मधील सर्व व्हिज्युअल्स पास करण्यात आले आहेत. पण डायलॉग्जवर कात्री चालवली आहे.
चित्रपटात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगचा उल्लेख आहे, यासाठी सेन्सॉरने निर्मात्यांना सांगितले की, एक तर च्यांचे नाव म्यूट करावे किंवा बदलावे. याशिवाय आयटम शब्दाच्या जागी "मॅडम" शब्दाचा उपयोग करण्यासाठी सांगण्यात आले आहे. डायलॉग ‘कुत्ते की तरह’ बदलून ‘बहुत बुरी तरह’ करण्यात आले आहे. याशिवाय, भगवान पासून सुरु करण्यात आलेला एक डायलॉग देखील बदलण्यास सांगितले आहे.
बदल करण्याच्या मागणीसह ‘सन ऑफ सरदार 2’ ला U/A 13+ सर्टिफिकेट मिळाले आहे. म्हणजेच १३ वर्षाहून अधिक वयाचे लोक हा चित्रपट पाहू शकतात. सेन्सॉर सर्टिफिकेटनुसार ‘सन ऑफ सरदार २’ ची लांबी १४७.३२ मिनिट आहे. म्हणजेच २ तास, २७ मिनिट आणि ३२ सेकंद आहे.
अजय देवगन शिवाय ‘सन ऑफ सरदार २’ मध्ये मृणाल ठाकुर, रवि किशन, नीरू बाजवा, दीपक डोबरियाल, कुब्रा सैत, चंकी पांडे, शरत सक्सेना, विंदू दारा सिंह, रोशनी वालिया, संजय मिश्रा, अश्विनी कालसेकर आणि दिवंगत अभिनेते मुकुल देव यासारखे कलाकार आहेत. चित्रपटाची निर्मिती देवगन फिल्म्स आणि जिओ स्टुडिओजने केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा यांनी केलं