बॉर्डर-2 या चित्रपटाने रिलीजच्या सातव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. अॅडव्हान्स बुकिंगपासूनच चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असून देशभरातील थिएटर्समध्ये प्रेक्षकांची गर्दी कायम आहे.
सनी देओल, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, वरुण धवन स्टारर चित्रपट बॉर्डर-२ची बॉक्स ऑफिसवर यसस्वी घोडदौड सुरुच आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईची गती कायम ठेवलीय. साहव्या दिवशी चांगला गल्ला चित्रपटाने जमवला होता. आता सातव्या दिवशी दुपारपर्यंत तगडी ॲडव्हान्स बुकिंग झाली आहे.
‘बॉर्डर २’ ने सहा दिवसात बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांचा आकड़ा पार केला आहे. या चित्रपटाने, २३ ते २८ जानेवारी पर्यंत २१३ कोटी रुपये कमावले आहेत. आता चित्रपटाच्या सातव्या दिवशी किती कमाई केली? सातव्या दिवशीही बॉर्डर २ ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बॉर्डर २ अॅडव्हान्स बुकिंग डे -७
मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत चित्रपटाने २.७० कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे. हे आकडे २९ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंतचे आहेत.
पहिला दिवस - ३० कोटी
दुसरा दिवस - ३६.५ कोटी
तिसरा दिवस- ५४.५ कोटी
चौथा दिवस- ५९ कोटी
पाचवा दिवस - २० कोटी
सहावा दिवस - १३ कोटी
सातवा दिवस ॲडव्हान्स बुकिंग-२.७० कोटी
रिपोर्टनुसार, २८ जानेवारी रोजी जवळपास २.१५ लाख तिकिटांची विक्री झाली होती. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईच्या अपेक्षा आणखी वाढलेल्या आहेत. आता सातव्या दिवसाची एकूण किती कमाई झालीय, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंह यांनी केले असून चित्रपटात सनी देओल, अहान शेट्टी, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, सोनम बाजवा, मोना सिंह मुख्य भूमिकेत आहेत.
'बॉर्डर २' वर्ल्डवाईड कलेक्शन
या चित्रपटाचे बजेट २७५ कोटीमध्ये बनलेले आहे. सनी देओलच्या या चित्रपटाने ओवरसीज म्हणजेच परदेशी मार्केटमध्ये ६ दिवसात ३७ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. देश विदेशात मिळून 'बॉर्डर २' ने सहा दिवसात एकूण २९२.१० कोटी रुपयांचे वर्ल्डवाईड ग्रॉस कलेक्शन केले