योगी आदित्यनाथ यांनी नाना पाटेकरांचे केले कौतुक, म्हणाले, “मला आश्चर्य वाटले की...” file photo
मनोरंजन

योगी आदित्यनाथ यांनी नाना पाटेकरांचे केले कौतुक, म्हणाले, “मला आश्चर्य वाटले की...”

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी पोलिसांच्या एका कार्यक्रमात नाना पाटेकर यांचे कौतुक केले.

पुढारी वृत्तसेवा

bollywood uttar pradesh cm yogi adityanath praises nana patekar up police song launch

पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी यूपी पोलिसांच्या एका कार्यक्रमादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांचे कौतुक केले. नाना पाटेकर यांनी कोणतीही प्रसिद्धी न करता शेतकऱ्यांना मदत केल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या ‘खाकी का सितारा’ या गीताच्या लॉन्चिंग कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर तसेच गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनीही सहभाग घेतला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाना पाटेकर यांच्या कार्याचे कौतुक केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले नाना पाटेकरांचे कौतुक

यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी नाना पाटेकर यांच्याबद्दल सांगितले की, महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या करत असताना नाना पाटेकर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले होते. ते म्हणाले, “नाना पाटेकर केवळ अभिनेते नाहीत, तर ते तितकेच संवेदनशील व्यक्तीही आहेत. महाराष्ट्रात जेव्हा मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या करत होते, तेव्हा मदतीचा हात पुढे करणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून नाना पाटेकर होते.”

नाना पाटेकरांना भेटून योगी आदित्यनाथ झाले होते हैराण

योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, नाना पाटेकर शेतकऱ्यांसाठी काम करत असताना त्यांना भेटण्यासाठी आले आणि त्यांनी स्वतःची ओळख करून दिली, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटले. ते म्हणाले, “मला आश्चर्य वाटले. एवढा मोठा अभिनेता शेतकऱ्यांसाठी काम करत आहे, पण हे खरं आहे.” नाना पाटेकर यांनी हे सर्व काम कोणतीही प्रसिद्धी किंवा दिखावा न करता शांतपणे केले, असेही त्यांनी सांगितले.

नाना पाटेकरांसोबत यूपी पोलिसांनी बनवली होती शॉर्ट फिल्म

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हेही सांगितले की, नाना पाटेकर यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या सायबर सिक्युरिटी अभियानातही शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यास मदत केली होती. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी शंकर महादेवन यांचेही कौतुक केले. उत्तर प्रदेश पोलिसांचे ‘खाकी का सितारा’ हे गाणे शंकर महादेवन यांनी आपल्या आवाजाने सजवले आहे.

जानेवारी २०२६ मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी सायबर गुन्हे, विशेषतः ‘डिजिटल अरेस्ट’बाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नाना पाटेकर यांच्यासोबत एक शॉर्ट फिल्म बनवली होती. त्याच फिल्मसाठी योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते नाना पाटेकर यांचे कौतुक केले.

योगी आदित्यनाथ यांनी शंकर महादेवन यांचेही केले कौतुक

योगी आदित्यनाथ यांनी शंकर महादेवन यांच्या गाण्याच्या शैलीचेही कौतुक केले. त्यांनी म्हटले, “त्यांचे नावच शंकर आहे आणि आपल्या नावाप्रमाणेच ते ‘डबल शंकर’ झाले आहेत. ते शंकरही आहेत आणि महादेवही.” गाण्याचे लॉन्चिंग श्रावण महिन्यात झाले, यावरही योगी आदित्यनाथ यांनी विशेष भर दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT