'छेदी सिंग, जो चित्रपट सोडलास तो बघशील का?' सलमानने जेव्हा सोनू सूदला विचारले.. file photo
मनोरंजन

'छेदी सिंग, जो चित्रपट सोडलास तो बघशील का?' सलमानने जेव्हा सोनू सूदला विचारले..

सोनू सूदने सांगितले का नाकारला 'दबंग २' चित्रपट

पुढारी वृत्तसेवा

bollywood sonu sood reveals why he did not do dabang 2 reveals what salman khan said to him

मुंबई : पुढारी ऑनलाईन

सोनू सूदने एका मुलाखतीत सांगितले की, तो दबंग मध्ये ‘छेदी सिंह’ ही खलनायकाची भूमिका साकारून खूप प्रसिद्ध झाला, पण दबंग 2 चा भाग तो का बनला नाही. तसेच, सलमान खान याने चित्रपटाच्या पहिल्या ट्रायलवेळी त्याला फोन करून काय सांगितले होते, हेही त्याने आता उघड केले आहे.

सोनू सूदने ‘दबंग’मध्ये छेदी सिंहच्या भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळवली. मात्र ‘दबंग 2’मध्ये तो दिसला नाही, त्यामुळे चाहत्यांना आश्चर्य वाटले. अलीकडील एका मुलाखतीत त्याने सांगितले की, सुरुवातीला त्याने ‘दबंग’ करण्यास नकार दिला होता, कारण त्याला छेदी सिंहचे कॅरेक्टर नीट समजले नव्हते.

तो म्हणाले की, दिग्दर्शक अभिनव कश्यप यांच्यासोबत अनेक चर्चा केल्यानंतर त्यांनी त्या भूमिकेत बदल सुचवले. दोघांनी मिळून त्या कॅरेक्टरमध्ये कॉमेडी आणि एंटरटेनमेंट वाढवली, ज्यामुळे तो अधिक प्रभावी झाला.

सोनू सुदने सांगितले की त्‍याला भूमिका पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, याने फार फरक पडत नाही. “जर ती भूमिका प्रेक्षकांना आनंद देते आणि त्यांचे मनोरंजन करते, तर तीच महत्त्वाची आहे,” असे तो म्हणाला.

‘दबंग 2’बाबत बोलताना त्याने सांगितले की, सलमान खान आणि अरबाज खान यांनी त्याला या चित्रपटासाठी विचारले होते. मात्र स्क्रिप्ट ऐकल्यानंतर त्याला ती नीट समजली नाही. “मला वाटले की मी या भूमिकेत फार सुधारणा करू शकणार नाही, म्हणून मी त्यांना शुभेच्छा देऊन चित्रपटातून बाहेर पडलो,” असे त्याने सांगितले.

तरीही, ‘दबंग 2’ सोडल्यानंतरही त्याचे आणि सलमान खान यांचे संबंध चांगलेच राहिले. सोनू सूदने सांगितले की, चित्रपटाच्या पहिल्या ट्रायलवेळी सलमान खानने त्यांना फोन करून विचारले, “छेदी सिंह, तू जी फिल्म सोडली, ती पाहशील का?” यावर त्याने होकार दिला आणि दोघांनी मिळून ‘दबंग 2’ पाहिला.

‘दबंग 2’मध्ये सोनू सूदची भूमिका प्रकाश राज यांनी साकारली होती. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला. यात सोनाक्षी सिन्हा, माही गिल, विनोद खन्ना, निकितन धीर, मनोज पाहवा, पंकज त्रिपाठी आणि दीपक डोबरियाल यांचाही समावेश होता.

माहितीनुसार, ‘दबंग 2’ने जगभरात सुमारे ₹265 कोटींची कमाई केली, तर भारतात सुमारे ₹155 कोटी नेट कलेक्शन केले. नंतर 2019 मध्ये ‘दबंग’चा तिसरा भागही प्रदर्शित झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT