Actor Yash : १४ मिलियन फॉलोअर्स तरीही यश फक्त एकाच व्यक्तीला करतो फॉलो; कोण आहे ती खास व्यक्ती? file photo
मनोरंजन

Actor Yash : १४ मिलियन फॉलोअर्स तरीही यश फक्त एकाच व्यक्तीला करतो फॉलो; कोण आहे ती खास व्यक्ती?

यशच्या फॉलोइंग लिस्टमध्ये फक्त एकच नाव, सांगितलं मन जिंकणारं कारण!

पुढारी वृत्तसेवा

bollywood ramayana and toxic actor yash follow only one person in instagram and thats her wife radhika pandit

पुढारी ऑनलाईन : सोशल मीडियावरही यशची चांगलीच फॅन फॉलोइंग आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का की इन्स्टाग्रामवर यश फक्त एका व्यक्तीला फॉलो करतो?

यश सध्या नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार यश ‘रावण’च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात यशसोबत रणबीर कपूर, साई पल्लवी आणि सनी देओल यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनेही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे. सोशल मीडियावर यशची मोठी फॅन फॉलोइंग आहे. मात्र, इन्स्टाग्रामवर 14 मिलियन (1.4 कोटी) पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेला यश फक्त एका व्यक्तीला फॉलो करतो.

14 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स

‘रामायण’चा अभिनेता यश नुकताच पत्रकार रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या टीव्ही कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी यशला त्याच्या आगामी चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक प्रश्न विचारण्यात आले.

यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका मुलीने यशला विचारले, “इन्स्टाग्रामवर तुमचे 14 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, पण तुम्ही फक्त एका व्यक्तीला फॉलो करता. ती व्यक्ती कोण आहे आणि तुमच्या आयुष्यात तिची काय किंमत आहे?” या प्रश्नावर यशने दिलेल्या उत्तराने त्याच्या लाखो चाहत्यांची मनं जिंकली.

साऊथ सुपरस्टार इन्स्टाग्रामवर फक्त यांनाच करतो फॉलो

हा प्रश्न ऐकताच यश हसू लागला आणि म्हणाला, “ती माझी पत्नी आहे.” हे ऐकताच संपूर्ण स्टुडिओ टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. यानंतर यश म्हणाला, “मी माझ्या पत्नीला (राधिका पंडित) का फॉलो करतो? कारण तीच माझी एकमेव मैत्रीण आहे आणि फॉलो करावंच लागतं ना... इन्स्टाग्रामवर शून्य फॉलोइंग ठेवली तर अडचण होईल.”

यानंतर मजेशीर अंदाज बाजूला ठेवत यश म्हणाला, “खरं सांगायचं झालं तर ती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. आम्ही दोघांनी एकत्र प्रगती केली आहे. ती माझी पत्नी आहे, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. ती माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे.”

यश पुढे म्हणाला, “ती माझ्या आयुष्यात केवळ मी यशस्वी आहे म्हणून नाही. मी काहीही नाही. कोणीही काहीही नाही. नात्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एखादी वस्तू खरेदी केली, मग ती कार असो किंवा टीव्ही, ती एकत्र खरेदी करावी. हाच आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.”

‘रामायण’मध्ये यश साकारणार रावणाची भूमिका

‘रामायण’चे दिग्दर्शन नितेश तिवारी करत असून नमित मल्होत्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. दोन भागांमध्ये बनणाऱ्या या बिग बजेट चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी सीता, रवि दुबे लक्ष्मण आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकारांचाही समावेश आहे. चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सचे काम DNEG सांभाळत आहे.

‘रामायण पार्ट 1’ परदेशात 6 नोव्हेंबर 2026 रोजी, तर भारतात 8 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘रामायण: पार्ट 2’ दिवाळी 2027 मध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

‘टॉक्सिक’ या दिवशी होणार रिलीज

‘रामायण’सोबतच सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाचीही देशभरातील प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटातून यश तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. मात्र, ट्रेलरमधील इंटिमेट सीन पाहून यशला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आणि काही युजर्सनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे. यश या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. यशसोबत कियारा अडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरेशी, नयनतारा आणि रुक्मिणी यांसारख्या अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच काळापासून प्रतीक्षा करत होते. अखेर हा चित्रपट 26 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT