आमिर खान 'कृष्‍ण', तर १८०० कोटींचा अभिनेता साकारणार 'अर्जुन'! या चर्चेने चाहत्‍यांची उत्‍कंठा शिगेला File Photo
मनोरंजन

Aamir Khan Mahabharat : आमिर खान 'कृष्‍ण', तर १८०० कोटींचा अभिनेता साकारणार 'अर्जुन'! या चर्चेने चाहत्‍यांची उत्‍कंठा शिगेला

आमिर खानच्या ड्रिम प्रोजेक्‍ट 'महाभारतची' जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात देशातील अनेक कलाकारांना घेण्याचा प्रयत्‍न

निलेश पोतदार

bollywood news will allu arjun play arjun role in aamir khan mahabharat

मुंबई : पुढारी ऑनलाईन

Aamir Khan Mahabharat : बॉलिवूडचा मिस्‍टर परफेक्शनिस्ट म्‍हणून अमिर खानची ओळख आहे. अमिर खान हा वर्षातून काही मोजकेच चित्रपट करतो, मात्र त्‍याची चित्रपटाची निवड आणि त्‍यातील त्‍याचे असलेले पात्र तो इतके हुबेहुब साकारतो की, त्‍याचा चित्रपट नेहमीच यशस्‍वी होतो. आताही त्‍याच्या चित्रपटांची माळच रिलीजसाठी तयार आहे, मात्र चर्चा आहे ती त्‍याचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्‍या 'महाभारत' ची यामध्ये १८०० कोटीच्या अभिनेत्‍याची एंट्री झाल्‍याने प्रेक्षकांची उत्‍सुकता वाढली आहे.

आमिर खानच्या चाहत्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लाल सिंह चड्ढानंतर आता आमिर खान पुन्हा एकदा कमबॅकच्या तयारीत आहे. 'सितारे जमीन पर' च्या रिलीजची तारीख समोर आली आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज होणार आहे. त्‍यातच आमिरचा ड्रिम प्रोजेक्‍ट असलेल्‍या 'महाभारत' ही चर्चेत आहे. या चित्रपटात १८०० कोटीच्या अभिनेत्‍याची एंट्री झाल्‍याने सर्वांची उत्‍सुकता वाढली आहे.

आमिर खानचा चित्रपट येणार म्‍हटल्‍यावर त्‍याच्या चाहत्‍यांमध्ये उत्‍साहाचे वातावरण आहे. 'लाल सिंह चड्ढा' च्या अपयशानंतर वर्षभरानंतर तो पुन्हा एकदा नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतीच 'सितारे जमीन पर' ची रिलीजची तारीख समोर आली आहे. त्‍याचा ट्रेलरही लवकरच लॉन्च होणार आहे. गेल्‍या काही दिवसात भारत-पाकिस्‍तानमध्ये उद्भवलेल्‍या युद्धप्रसंगामुळे ट्रेलर लॉन्च पुढे ढकलण्यात आले होते. त्‍याच्या या चित्रपटासोबतच त्‍याचा ड्रिम प्रोजेक्‍ट असलेल्‍या 'महाभारत' वर बोलताना त्‍याने सांगितले होते की, त्‍याला कृष्‍णाचे पात्र खूप प्रभावित करते. आता तर अशी माहिती समोर येत आहे की, या चित्रपटासाठी 'अर्जुन' ही मिळाला आहे. तो कोण असेल ते पाहुया.

आमिर खान हा 'महाभारत' चित्रपटात कृष्‍णाची भूमिका साकारणार असल्‍याची माहिती समोर येत होती. या दरम्‍यान 'पुष्‍पा' फेम अल्‍लू अर्जुन सोबत आमिर खान दिसून आला होता. दोघांना एकत्र पाहून चाहत्‍यांना प्रश्न पडला होता की, हे दोघे एकत्र येण्याचे कारण काय? तर आता माहिती समोर येतेय ती म्‍हणजे या चित्रपटात आमिरसोबत सुपरस्‍टार अल्‍लू अर्जुनही भूमिका साकारणार आहे. या विषयी जाणून घेवूयात...

अर्जुनाची भूमिका कोण साकारणार?

काही दिवसांपूर्वी अमिर खान आणि अल्‍लू अर्जुन मुंबईमध्ये एकत्र आले होते. यानंतर अशीही माहिती समोर आली होती की, 'महाभारत' मध्ये अर्जुनच्या भूमिकेसाठी अल्‍लू अर्जुनला घ्‍यावे. दरम्‍यान या भेटीमागे आणखीही एक कारण सांगितले जात आहे की, त्‍याला एटली आणि अल्‍लू अर्जुनच्या चित्रपटात पाहिले जाउ शकते. हेच कारण आहे की, एटली सोबत अल्‍लू अर्जुन मुंबईमध्ये आमिर खानला भेटायला आले होते. आता यात नेमके तथ्‍य काय आहे ते आमिर खानच सांगू शकतो. पण त्‍यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे.

या प्रोजेक्‍ट विषयी अशी माहिती समोर येत आहे की, आमिर खानच्या महाभारतचा पहिला भाग संजय लिला भंसाली दिग्‍दर्शित करतील. तर या चित्रपटात भारताच्या प्रत्‍येक राज्‍यातील कलाकार असावेत अशी आमिर खानची इच्छा आहे. हा चित्रपट अनेक भागात बनवला जाणार आहे. मात्र या विषयी अधिकृत माहिती अजुन जाहीर करण्यात आलेली नाही.

आमिर भगवान कृष्णापासून प्रेरित

आमिर खानने त्‍याच्या ड्रिम प्रोजेक्‍ट महाभारत विषयी सांगितले होते. तो म्‍हणाला होता की, महाभारतवर चित्रपट बनवणे हे माझे स्‍वप्न आहे. मात्र हे खूप अवघड आहे. तसेच मला कृष्‍णाचे पात्र खूप प्रभावित करते असे तो म्‍हणाला होता. पण जर का अल्‍लू अर्जुनची बातमी खरी असेल तर चाहत्‍यांसाठी ती आनंदाचीच गोष्‍ट असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT