bollywood ghar kab aaoge song from border 2 release sonu nigam arijit singh diljit dosanjh and vishal mishra sung it
मुंबई : पुढारी ऑनलाईन
Ghar Kab Aaoge Song Release: सनी देओलचा आगामी चित्रपट ‘बॉर्डर 2’ मधील पहिले गाणे ‘घर कब आओगे’ रिलीज झाले आहे. या गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.
अभिनेता सनी देओल स्टारर बॉर्डर चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली होती. यातील गाण्यांनी सर्वांच्या हद्यात घर केले होते. त्यामुळे बॉर्डर 2 कसा असेल या विषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र चाहत्यांचा आतुरता आता संपली आहे. ‘बॉर्डर 2’ मधील बहुप्रतिक्षित ‘घर कब आओगे’ हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. सध्या निर्मात्यांनी फक्त गाण्याचे ऑडिओ व्हर्जन रिलीज केले आहे. गाण्याचा व्हिडिओ व्हर्जन आज संध्याकाळी रिलीज केला जाणार आहे. गाण्याची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. सध्या हे गाणे विविध ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर ऐकता येत आहे.
या गायकांनी दिला आहे आवाज
‘घर कब आओगे’ हे गाणे ‘बॉर्डर’ चित्रपटातील लोकप्रिय गीत ‘संदेसे आते हैं’ याचे री-क्रिएटेड व्हर्जन आहे. त्याच धूनवर, नव्या अंदाजात आणि नव्या शब्दांसह हे गाणे सादर करण्यात आले आहे.
मूळ ‘संदेसे आते हैं’ हे गाणे जावेद अख्तर यांनी लिहिले होते आणि अनु मलिक यांनी त्याला संगीत दिले होते. या नव्या व्हर्जनचे गीतलेखन मनोज मुंतशिर यांनी केले असून संगीत मिथुन यांचे आहे.
पूर्वी हे गाणे सोनू निगम आणि रूप कुमार राठौड यांनी गायले होते. मात्र यावेळी हे गाणे चार गायकांच्या आवाजात सादर करण्यात आले आहे.
या गाण्याला सोनू निगम, अरिजीत सिंह, दिलजीत दोसांझ आणि विशाल मिश्रा यांनी आपला आवाज दिला आहे. या चारही लोकप्रिय गायकांच्या आवाजामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
23 जानेवारीला चित्रपट होणार प्रदर्शित
अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट 23 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सनी देओल याच्यासोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच मोना सिंह, सोनम बाजवा, आन्या सिंह आणि मेधा राणा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
देशभक्तीने भारलेला या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता, ज्याला चाहत्यांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती कमाल दाखवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.