मनोरंजन

Thank God : अजय देवगण ‘चित्रगुप्त’ च्या भूमिकेत

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'थँक गॉड' ( Thank God ) चित्रपट लवकरच येत आहे. सध्या या चित्रपटातील दोन पोस्टर आणि ट्रेलर रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अजय देवगण 'चित्रगुप्त' तर सिद्धार्थने पोलिसाची भूमिका साकारली आहे.

अभिनेता अजय देवगणच्या आगामी 'थँक गॉड' ( Thank God ) चित्रपटाचे एकूण दोन पोस्टर प्रसिद्ध झाली असून पहिल्या पोस्टरमध्ये अजय देवगण तर दुसऱ्या पोस्टरमध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा हटके अंदाज पाहायला मिळत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये काहीशी पांढरी झालर असलेले केस, पांढरी दाढी, डोळ्यावर गॉगल आणि काळ्या रंगाचा शर्ट-पँट आणि काळ्या रंगाचे ब्लेझर असा पेहराव केलेला अजय देवगण पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय. तर सिद्धार्थ मल्होत्राने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ग्रीन रंगाचे ब्लेझर परिधान केले आहे. यासोबत त्याच्या हातात व्हाईट आणि ब्लॅक रंगाचे दोन बॉल दिसत आहेत. खास करून या चित्रपटात अजय देवगण 'चित्रगुप्त'ची भूमिका साकारणार आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांच्या पंसतीस उतरले आहेत.

रकुल प्रीत सिंहनेदेखील पोस्टर शेअर करून हा एक कॉमेडी चित्रपट असल्याचा खुलासा केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच, ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी तर कथा आकाश कौशिक आणि मधुर शर्मा यांनी लिहिली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा आयटम सॉन्ग पाहायला मिळणार आहे. थँक गॉड हा चित्रपट २५ ऑक्टोबर २०२२ थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT