Sai Tamhankar movie Bol Bol Rani Box Office collection  pudhari photo
मनोरंजन

Bol Bol Rani BO collection : 'बोल बोल राणी'ची कमाई कासवगतीने, सई ताम्हणकरच्या 'या' क्राईम थ्रिलर चित्रपटाने किती कमावले?

Bol Bol Rani BO collection : 'बोल बोल राणी'ची कमाई कासवगतीने, सई ताम्हणकरच्या 'या' क्राईम थ्रिलर चित्रपटाने किती कमावले?

पुढारी वृत्तसेवा

Bol Bol Rani Disaster? Sai Tamhankar movie Box Office collection

सई ताम्हणकरच्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटाच्या यशानंतर चर्चा झाली ती बोल बोल राणी या चित्रपटाची. सई ताम्हणकरचा मराठी विनोदी क्राईम थ्रीलर चित्रपट बोल बोल राणी १७ जुलैला रिलीज झाला. रिलीज नंतर विकेंडच्या कमाईचे आकडे पाहता ते निराशाजनक ठरले. विकेंडचा भरपूर फायदा या चित्रपटाला होईल, असे वाटत होते. पण, तिकिट बारीवर विक्रीत वाढ होऊन देखीलही एकूण कमाई सुमार ठरली. १७ तारखेनंतर पहिल्या चार दिवसांत १३-१४ लाखांची कमाई केली.

दुसरीकडे, चौथ्या दिवशी केवळ १ लाख रुपये कमावल. पाचव्या दिवशी पुन्हा १ लाखांची भर पडली. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर एकूण १५ लाख रुपयांची 'नेट' कमाई झाली. ही रक्कम १७ लाख रुपये 'ग्रॉस' (एकूण) इतकी झाली. आता एकूण लाइफटाईम कमाई १८ ते १९ लाख रुपये होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

भारतातील एकूण कमाईचे आकडे -

दिवस पहिला - २ लाख

दिवस दुसरा - ५ लाख

दिवस तिसरा - ६ लाख

दिवस चौथा - १ लाख

दिवस पाचवा १ लाख

एकूण - १५ लाख

बजेट आणि वसुली

चित्रपटाचे बजेट अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. पण, मीडिया रिपोर्टनुसार, अडीच त ३ कोटींचे चित्रपटाचे बजेट असल्याचे म्हटले जात आहे. म्हणजेच एकूण नेट कमाई पाहता, एकूण बजेटच्या केवळ ५-६ टक्केच रक्कम वसूल झाली आहे. ज्यामुळे चित्रपटाला मोठे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

बोल बोल राणी चित्रपटात सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे आणि इतर कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपट समीक्षकांनी 'बोल बोल राणी'ला संमिश्र प्रतिसाद दिला आहे. पण प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवलेली दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT