पुढारी ऑनलाईन डेस्क : बिपाशा बसू ही बोल्ड अंदाज आणि बिनधास्त वागण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता तिचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला किस करताना दिसत आहे. हा फोटो २००७ मधील आहे. बिपाशा आणि ख्रिस्तियानो यांचा किस करतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर ते दोघे डेट करत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. दोघांची ओळख पोर्तुगालमध्ये एका पार्टीत झाली होती. त्यावेळी रोनाल्डोने बिपाशाचा किस घेतला होता. यावर बिपाशाने म्हटले होते की, त्याला भेटणे हे एक मोठे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.
सोहळ्यानंतर आम्ही क्लबिंगला गेलो. तो आता माझा मित्र आहे आणि त्याने मला वचन दिले होते की, तो त्याच्या प्रत्येक सामन्यासाठी मला कॉल करेल. रोनाल्डो आणि बिपाशा यांची ओळख झाली, त्यावेळी बिपाशा ही जॉन अब्राहमसोबत नात्यात होती. रोनाल्डो आणि बिपाशा इतके जवळ आले होते की, त्याचा जॉनसोबतच्या नातेसंबंधावर परिणाम झाला होता. बिपाशाने २००१ मध्ये 'अजनबी' या चित्रपटातून बॉलीवूड पदार्पण केले होते आणि यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.