पुढारी ऑनलाईन डेस्क - देव एंटरटेनमेंट व्हेंचर्सच्या आगामी बहुप्रतीक्षित "बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान"च्या पोस्टरचे अनावरण नुकतेच विनोदिनी या पूर्वी स्टार थिएटर म्हणून कोलकाता येथे प्रसिद्ध असलेल्या थिएटरमध्ये निर्माते, दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या हस्ते झाले.
पोस्टरमध्ये अभिनेता चंदन रॉय सान्याल यांची विशेष ओळख करून देण्यात आली आहे. प्रमोद फिल्म्स द्वारे विविध मोशन पिक्चर्सच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुती असलेला बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान हा बंगाली भाषेतील चित्रपट २३ जानेवारीला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट उत्तर कोलकात्यातील रेड-लाइट एरियतील एका तरुण मुलीचा प्रेरणादायी पण हृदयद्रावक प्रवासाचे वर्णन करणारा आहे. ज्या मुलीने थिएटर क्षेत्रात येऊन यशस्वी कारकीर्द घडवली जिला नटी बिनोदिनी म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेक अडीअडचणींचा सामना करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नटी बिनोदिनी यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
या चित्रपटात अभिनेता राहुल बोस, कौशिक गांगुली, मीर, चंद्रेयी घोष आणि ओम सहानी यांसारखे प्रतिभावान कलाकार आहेत. प्रियांका पोद्दार यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत तर अभिरा चक्रवर्ती यांनी संशोधन केले आहे. सौमिक हलदर हे डीओपी आहेत. सौरेंद्रो सोम्योजित या दिग्गज संगीतकार जोडीने संगीत दिले आहे. तन्मय चक्रवर्ती हे कला दिग्दर्शक आहेत आणि चित्रपटाचे संपादन प्रणॉय दासगुप्ता यांनी केले आहे. सुचस्मिता दासगुप्ता यांनी वेशभूषा केली आहे. बिनोदिनी हा एक असा चित्रपट आहे जो स्त्रियांच्या न सांगितल्या जाणाऱ्या कथांवर प्रकाश टाकतो आणि स्वप्न पाहण्याच्या धाडसासाठी त्यांना किती किंमत मोजावी लागते.