Shiv Thakare wedding
मुंबई: बिग बॉस फेम मराठमोळा शिव ठाकरे लग्नबंधनात अडकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या, अखेर आज शिवने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
शिवने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये फक्त 'Finally' असे लिहिले आहे. या फोटोमध्ये शिवने गुलाबी रंगाचे पारंपरिक धोतर आणि शेला परिधान केला असून तो एका लग्नाच्या मांडवात उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या समोर पाठमोरी उभी असलेली मुलगी नक्की कोण आहे? याबाबत त्याने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.
शिवची ही पोस्ट पाहताच चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. सेलिब्रिटींनी देखील या पोस्टवर कमेंट करत त्याचे अभिनंदन केले आहे. "ती मुलगी कोण आहे?", असे प्रश्न त्याचे चाहते विचारत आहेत.