Sana Makbul Hospitalized  Instagram
मनोरंजन

Sana Makbul Hospitalized | बिग बॉस ओटीटी ३ विजेती सना मकबुल रुग्णालयात दाखल, लिवरशी संबंधित समस्या

Bigg Boss OTT 3 Winner Sana Makbul Hospitalized | लिवरशी संबंधित समस्येमुळे सना मकबूलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्वालिया न. शिकलगार

Sana Makbul Hospitalized due to Grave Health Condition

मुंबई - बिग बॉस ओटीटी ३ विजेती, अभिनेत्री सना मकबूलने खुलासा केला होता की, ती काही काळापासून ऑटोइम्यून समस्यांशी लढा देत आहे. फॅन्सनी अंदाज लावला आहे की, तिची अचानक प्रकृती बिघडण्याचे कारण हेच असू शकतं. पण तिची स्थिती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. पण, अद्याप तिच्याकडून आजाराविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तिने आपल्या कुटुंबीयांसमवेत ईद साजरी करतानाचे फोटो पोस्ट केले होते. पण काही वेळानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. रिपोर्टनुसार, तिच्या मैत्रीणीने रुग्णालयातून सनाचा एक फोटो शेअर केला आणि ती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली.

बेडवर सना निराश बसलेली दिसतेय. तिच्या मैत्रीणीने लिहिलं, "माझी सर्वात स्ट्रॉन्ग दीवा, मला तुझा अभिमान आहे. तू इतक्या गंभीर आजाराशी हिंमतीने आणि धैर्याने लढत आहेस. परमेश्वर तुझ्यासोबत आहे. तू लवकरच यातून बाहेर पडशील. मी नेहमी तुझ्यासोबत असेन. लवकर ठिक हो, माझी जान दीवा सना.''

ऑटोइम्यून लिव्हरशी पीडित अभिनेत्री

यावर्षी पॉडकास्टमध्ये तिने म्हटलं होतं की, ''ती २०२० पासून ऑटोइम्यून लिव्हर डिसीजशी पीडीत आहे. हा आजार मायोसायटिसशी मिळता-जुळता आहे. अभिनेत्री सामंथा रुथ प्रभुला देखील आहे. त्यामुळे ती वीगन बनली. अनेकांना माहिती नाही की, तिला ऑटोइम्यून हेपेटायटिस आहे. लिवरशी संबंधित आजार..२०२० मध्ये निदान झालं. याची कुठली खास लक्षणे दिसत नाही. या आजारात शरिराच्या स्वत:च्या पेशी शरीरावर हल्ला करतात. सनाच्या केसमध्ये कधी-कधी हे ल्यूपस प्रमाणे होतं-कधी किडनीवर परिणाम तर कधी गठिया सारखी समस्या (आर्थरायटिस) उद्भवते. सामंथा रुथ प्रभुला मायोसायटिस आहे, जो मांसपेशींचा आजार आहे. सनाला लिवरशी संबंधित हा आजार आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT