मनोरंजन

BBM 4 : तुला सोडणार नाही – विकास राखीवर भडकला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरात काल भरलेल्या BB High School मध्ये प्रसादने केलेल्या मिमिक्रीमुळे उडाला मनोरंजनाचा बार. तर अक्षय – प्रसादमध्ये झाला जोरदार राडा. एका व्यक्तीने काल बिग बॉस मराठीच्या घरातील इतर सदस्यांचे कालपासून जगणे मुश्किल केले आहे. कालपासून राखीने घरात धुडगूस घातला आहे. राखीच्या वागण्यामुळे विकासची घाबरगुंडी उडाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखी विकासला तिचा नवरा आहे असे सांगते आहे.

राखी विकासला म्हणाली, याचं नावं राजू आहे, हा माझा नवरा आहे. राखीच्या वागणुकीला बघून किरण माने विकासला म्हणाले, तिच्या अंगात काहीतरी आलंय… राखीने विकासला विचारले, तुला माझं भयानक रूप बघायचे आहे का ? मी तुला सोडणार नाही.

SCROLL FOR NEXT