Bigg Boss Marathi 6 मध्ये सागर कारंडेची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आणि लगेचच त्याने आपल्याच ग्रुपवर नाराजगी व्यक्त केली. घरातल्या याच क्षणी बदललेल्या वातावरणाने सर्व स्पर्धक आणि प्रेक्षकांसाठी एक धक्का निर्माण केला.
Bigg Boss Marathi season 6 latest updates
बिग बॉस मराठी सीझान ६ च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा रंगली आहे. लवकरच घरात नव्या सदस्याची वाईल्ड एन्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे. रविवारी भाऊच्या धक्क्यावर एक महत्त्वाचं एलिमिनेशन पार पडलं. घरातील स्पर्धक राधा पाटीलला घरातून बाहेर पडावं लागलं. घरातील इतर स्पर्धकांसाठी हा धक्काच होता. आता 'बिग बॉस'च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री कुणाची होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, सागर कारंडे आपल्या भावना व्यक्त करतोय.
सागर कारंडे आपल्याच ग्रुपमुळे दुखावला गेलाय. तो म्हणतो की, 'मला थोडंसं ना वाईट वाटलं...आणि का नाही वाईट वाटणार...मी सगळ्यांची चांगेल रिलेशन ठेवलं आहे...' पण तो हे नेमकं कसासाठी बोलत आहे, ह अद्याप समोर आलेलं नाही.
राकेशबद्दल अनुश्रीने मांडले ठाम मत
अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यातील वाद काय संपेना. आता अनुश्रीने राकेशबद्दल ठाम मत मांडलंय. ती म्हणते...''राकेश बापट हा फक्त आणि फक्त तिच्यामुळे आणि माझ्यामुळे दिसला...मीच फक्त का घराचा विचार करू? तिचे पण वांदे आणि माझे पण वांदे...''
सध्या या सीझनमध्ये गेमचा तिसरा आठवडा सुरू आहे. अनेक स्पर्धक गेमच खेळत नसल्याचे बिग बॉसने दाखवून दिले. यामध्ये सोनाली राऊतने स्पष्टच सांगितले होते की, तिला वाटले म्हणून तिने गेम खेळला नाही. यानंतर रितेश देशमुख तिची शाळा घेतानाही दिसला. घरातील सदस्य खेळात कुठेच दिसत नसल्याचे बिग बॉसने सांगत चांगलेच खडसावले होते. "काही सदस्य मिस्टर इंडिया झाले आहेत, ते खेळात कुठेच दिसत नाहीत. फक्त घरची कामं करणं म्हणजे गेम खेळणं नाही", असे स्पर्धकांना सुनावले होते.
राकेश की रुचिता..दोघांपैकी मिस्टर इंडिया नॉमिनेशन कार्यात नेमकं कुणाचं नाव घेतलं जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बिग बॉस सीझन ६ मध्ये अभिनेता राकेश बापट, सागर कारंडे, दिपाली सय्यद, सोनाली राऊत, अनुश्री माने, दिव्या शिंदे, प्रभू शेळके हे स्टार सध्या स्पर्धक आहे.