Bigg Boss Marathi - 6 latest update  pudhari photo
मनोरंजन

Bigg Boss Marathi - 6 | सोफ्यावर राखीने फेकलं पाणी, विशाल-राखीमध्ये बाचाबाची; बिग बॉसच्या घरात होणार पंगा?

Bigg Boss Marathi -6 | विशालच्या सोफ्यावर राखीने फेकलं पाणी, विशाल आणि राखीमध्ये बाचाबाची; बिग बॉसच्या घरात होणार पंगा?

स्वालिया न. शिकलगार

Bigg Boss Marathi 6 च्या घरात पुन्हा एकदा मोठा वाद रंगला आहे. राखी सावंतने विशालच्या सोफ्यावर पाणी फेकल्यामुळे दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या घटनेमुळे घरातील इतर सदस्यही आश्चर्यचकित झाले. सोशल मीडियावर या वादाचा व्हिडिओ आणि चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रेक्षकांना पुढे काय होणार याची उत्सुकता लागली आहे.

Bigg Boss Marathi - 6 - fight between rakhi and vishal

कलर्स मराठीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राखी आणि विशालमध्ये वाद झालेला दिसतो. विशाल सोफ्यावर बसलेला दिसतो. त्याचवेळी समोर राखी येते आणि त्याला उठण्यास सांगते. पण विशाल सोफ्यावरून उठत नाही, त्यामुळे वाद आणखी वाढतो.

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो Bigg Boss Marathi च्या सहाव्या सिझनमध्ये सध्या प्रचंड ड्रामा आणि वाद पाहायला मिळत आहेत. इन्स्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये राखी सावंत आणि विशाल यांच्यात जोरदार वाद झाला असून हा प्रसंग सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

घरातील एका चर्चेदरम्यान राखी सावंतने अचानक विशालच्या सोफ्यावर पाणी फेकले. यानंतर दोघांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली. या वादामुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण काही काळासाठी पूर्णपणे तापले. इतर स्पर्धकांनीही हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले.

राखी म्हणते- हा सोफा आहे. इथे सगळ्यांना बसायचं आहे. मी इथे बसलोय. मी बाहेर होतो तेव्हा का नाही लावलं.. यावर राखी म्हणते, आपण उठणार आहे की नाही की मी पाणी टाकू? विशाल प्रतयुत्तर देतो-टाक. मी सगळ्यांच्या बेडवर पाणी टाकतो. राखी देखील संतापते आणि बादलीमधून पाणी आणते आणि सोफ्यावर फेकते. यावेळी घरातील सदस्यांमध्ये गोंधळ होतो. आता या प्रकारानंतर विशाल काय निर्णय घेतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

राखी सावंत ही आपल्या बिनधास्त स्वभावासाठी आणि थेट बोलण्याच्या शैलीसाठी ओळखली जाते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात तिच्या उपस्थितीमुळे नेहमीच काही ना काही ड्रामा पाहायला मिळतो. या घटनेनंतर सोशल मीडियावर वादाची चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT