rakhi sawant will entered Bigg Boss Marathi 6 house  instagram
मनोरंजन

Bigg Boss Marathi 6 - सळो की पळो करुन सोडणार 'परदेसीयां गर्ल' राखी सावंत, ओमकार राऊत घराबाहेर येताच म्हणतो...

Bigg Boss Marathi 6 - सळो की पळो करुन सोडणार 'परदेसीयां गर्ल' राखी सावंत, ओमकार राऊत घराबाहेर येताच म्हणतो...

स्वालिया न. शिकलगार

Bigg Boss Marathi 6 च्या घरामध्ये राखी सावंतची एन्ट्री झालीय. आपल्या तालावर नाचवायला ती तयार आहे. दुसरीकडे ओमकार राऊतला घराचा निरोप घ्यावा लागलाय.

rakhi sawant will entered Bigg Boss Marathi 6 house latest news

बिग बॉस मराठी ६ सध्या दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत चालला आहे. घरातील सदस्यांमधील वाद, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक ड्रामा यामुळे प्रेक्षकांचे लक्ष खिळून राहिले आहे. अशातच परदेसीयां गर्ल राखी सावंत घरात येतेय. पुन्हा एकदा तिच्या बेधडक स्वभावामुळे चर्चेत आली आहे.

बिग बॉस मराठी सीझन ६ च्या घरात राखी सावंतची एन्ट्री झाली आहे. नागीनच्या लूकमध्ये ती घरात सदस्यांशी संवाद साधताना दिसते. बिग बॉस मराठीच्या घरात येताच राखीने आपल्या तालावर नाचायला भाग पाडलंय. दुसरीकडे मात्र प्रभूने मात्र पुंगी वाजवत राखीला नाचवण्याचा प्रयत्न केला.

राखीचा कहर -

घरात येताच राखी सावंत सर्वांची ओळख करून घेते. ती आपल्या मिश्किल स्वभावामुळे सर्वांना हसवते. राकेश बापट आणि तन्वी कोलते यांच्यावर विनोद करून राखीन सर्वांचे लक्ष वेधले. पण राखी घरातला गेम पालटणार आहे का? हे पाहणं रंजक असणार आहे.

राखी नागिनीचा पोषाख परिधान करते आणि म्हणते- कुठे आहे माझा सपेरा... दुसरीकडे आवाज ऐकू येतो की, बिग बॉस हे काय पाठवलंय आणि का पाठवलंय? दरम्यान, राखी आणि सागर कारंडे गोड फ्लर्टिंग कताना दिसताहेत. जिममध्ये ७ वाजता टच होणार, असे सागर कारंडे म्हणतो.

राकेश बापट आपल्या लग्नाविषयी म्हणतो-

राकेश बापट आपल्या लग्नाविषयी म्हणतो की, 'मी लग्न करेन तर एका गायिकेशी करेन. ती रोज रियाज करेल आणि मी ऐकेने. ती साडी नेसून केस सोडून तानपुरा घेऊन.. प्युअर भावनांनी.' गातेय...

घराबाहेर येताच ओमकार म्हणाला...

बिग बॉसच्या घरात माझा अनुभव खूप चांगला होता. इंटरेस्टिंग गेम हते. टास्क होता, वाद होता, फ्रेंडशीप होती. तन्वी, विशाल, राकेश, आयुष हे टॉप फाईव्ह मध्ये असतील, असे ओमकारला वाटतं. घरातील मास्टरमाईंड विशाल असल्याचे तो एका मीडियाशी बोलताना म्हणाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT