Tanvi Kolte 
मनोरंजन

BB Marathi 6 Winner : तन्वी कोल्टे ठरली ‘बिग बॉस मराठी ६’ ची महाविजेती; ट्रॉफी आणि १५ लाखांसह रितेशने दिली 'ही' खास भेट

'बिग बॉस'च्या मानाच्या ट्रॉफीवर 'तन्वी'ने उमटवली आपल्या विजयाची मोहोर

दिनेश चोरगे

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावत खिळवून ठेवणाऱ्या 'बिग बॉस मराठी सीजन ६' (Bigg Boss Marathi 6) चा रविवारी (दि.१९) महाअंतिम सोहळा पार पडला. या चुरशीच्या लढतीत सर्व स्पर्धकांना मागे टाकत तन्वी कोल्टेने 'बिग बॉस'च्या मानाच्या ट्रॉफीवर आपल्या विजयाची मोहोर उमटवली.

'बिग बॉस'ची मानाची ट्रॉफी आणि १५ लाखांचे बक्षीस

अंतिम फेरीत पोहोचलेल्या टॉप-५ स्पर्धकांमध्ये तन्वी कोल्टेसह विशाल कोटीयन, राकेश बापट, अनुश्री माने आणि दिपाली सय्यद यांचा समावेश होता. या सर्वांमध्ये चुरस पाहायला मिळाली, मात्र तन्वीला जनतेने दिलेल्या प्रेमाने (जनमतामुळे) तिने विजेतेपदाला गवसणी घालत 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकली. तर या स्पर्धेत राकेश बापट उपविजेता ठरला. या मानाच्या टॉफीसह तिला १५ लाखांचे बक्षीस मिळाले. यासह तिला पु. न. गाडगीळ आणि सन्स कडून १० लाखाचं व्हाउचर आणि ई- मोटर्सकडून ई- बाईक मिळाली. यावर्षी ग्रँड फिनालेला जिनिलीया देशमुख व अभिषेक बच्चन हे बॉलीवूड कलाकार उपस्थित होते.

रितेश देशमुखकडून मिळाली 'ही' खास भेट

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' आगामी चित्रपट प्रेषकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्त त्याने या चित्रपटाच्या टीमकडून तन्वीला शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेली एक सुंदर फ्रेम भेट म्हणून दिली. ही भेट स्वीकारताना तन्वी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT