bigg boss marathi 6 updates  instagram
मनोरंजन

Bigg Boss Marathi-6 | कुल बॉईज रोशन-ओमकारमध्ये जुंपलं, घरात नवा ड्रामा?

Bigg Boss Marathi-6 | कुल बॉईज रोशन-ओमकारचं जुंपलं, घरात नवा ड्रामा?

स्वालिया न. शिकलगार

कूल बॉईज ग्रुपमधील रोशन आणि ओमकार यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. एकमेकांचे जवळचे मित्र मानले जाणारे हे दोघे अचानक आमनेसामने आल्याने घरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

bigg boss marathi 6 updates

बिग बॉस मराठी सीझन ६च्या घरात नवा ड्रामा पाहायला मिळणार आहे. घरातील कुल बॉईज रोशन आणि ओमकारचं डोकं तापणार आहे. दोघांच्यातही चांगलंच जुंपलं आहे. दोघेही एकमेकांवर आवाज चढवून बोलत आहेत.

Bigg Boss Marathi 6 च्या घरात दररोज नवे ड्रामे पाहायला मिळत असताना ‘कूल बॉईज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोशन आणि ओमकार यांच्यातील वादाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे दोघे अचानक आमनेसामने आल्यामुळे घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एका टास्कदरम्यान सुरू झालेल्या मतभेदांमुळे हा वाद चिघळत गेला. सुरुवातीला शब्दांपुरता मर्यादित असलेला हा वाद नंतर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला. रोशनने ओमकारवर गेम प्लॅन लपवून खेळत असल्याचा आरोप केला, तर ओमकारनेही रोशनवर डबल गेम खेळत असल्याचं म्हणत प्रत्युत्तर दिलं.

डबल एव्हिक्शन होणार?

घरामध्ये नियम मोडल्यामुळे बिग बॉसने कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरातील एकहून अधिक स्पर्धक बाहेर जाण्याची शक्यता आहे. बिग बॉसने आधीच स्पष्ट केलं आहे की, या आठवड्यात नियमांचं उल्लंघन वाढत चाललं आहे. त्यामुळे यापुढे एक व्यक्तीऐवजी अधिक सदस्य घराबाहेर जाऊ शकतात. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष एविक्शनकडे लागून राहिले आहे. A

राखी सावंतची एन्ट्री होणार?

या पर्वात पुन्हा राखी सावंत वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून नव्हे तर गेस्ट म्हणून येणार असल्याचे वृत्‌ समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राखी या आठवड्यात दोन आठवड्यांसाठी घरात येईल. यानंतर घरातील वातावरण कसे होते, कोणते गेम पालटमार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT