मनोरंजन

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडणार ‘विष-अमृत’ नॉमिनेशन कार्य

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामधून किक बॉक्सर योगेश जाधवला बाहेर पडावे लागले. तर घरातील सदस्यांना मिळाले सरप्राईझ. कारण घरामध्ये झाली सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणजेच स्नेहलता वसईकर. आता तिच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलणार? नॉमिनेशन कार्यात त्याचा काय परिणाम होणार, हे पाहणं फारचं रंजक ठरणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रमोमध्ये बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपावले आले आहे विष-अमृत हे नॉमिनेशन कार्य. बिग बॉस यांनी जाहीर केले, "जो सदस्य पेटारा उघडुन त्यातील विष मिळवेल तो ठरवेल विरोधी टीममधील कोणता सदस्य नॉमिनेट होईल". बघुया यात कोणती टीम बाजी मारणार? आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT