Bigg Boss 20 contestant  Pudhari photo
मनोरंजन

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०'चं धमाकेदार ओपनिंग! सलमान खानने केली १७ स्पर्धकांची एंट्री; 'वरदान' थीमसह रंगणार नवा सीझन

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०'चं धमाकेदार ओपनिंग! सलमान खानने केली १७ स्पर्धकांची एंट्री; 'वरदान' थीमसह रंगणार नवा सीझन

पुढारी वृत्तसेवा

Salman Khan welcomes these 17 contestants Bigg Boss 20

रिॲलिटी शो विश्वातील सर्वात मोठा आणि बहुचर्चित शो 'बिग बॉस २०'चा ग्रँड प्रीमियर ६ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खानने या मैलाचा दगड ठरणाऱ्या २०व्या सीझनमध्ये मनोरंजन, क्रीडा, संगीत आणि डिजिटल जगतातील तब्बल १७ स्पर्धकांचे घरात स्वागत केले.

सलमानची ३८ वर्षे आणि २० गाण्यांचा स्वॅग

चित्रपटसृष्टीतील आपली ३८ वर्षे साजरी करत सलमान खानने आपल्या २० आयकॉनिक गाण्यांवर धमाकेदार परफॉर्मन्स देत शोची सुरुवात केली. या ग्रँड प्रीमियरला भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ आणि मनोज तिवारी यांनीही खास उपस्थिती लावून रंगत वाढवली. मनोज तिवारी यांची मुलगी रीति तिवारी यंदा स्पर्धक म्हणून घरात दाखल झाली आहे.

बॉक्सिंग चॅम्पियन मॅरी कॉमपासून ते सोशल मीडिया स्टार्सची फौज!

भारताची दिग्गज ऑलिम्पियन बॉक्सर एम. सी. मॅरी कॉम हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने विशेष व्हिडिओ मेसेज पाठवून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर भोजपुरी क्वीन आम्रपाली दुबे, टीव्ही अभिनेत्री माही विज, कनिका मान, उदिति सिंह, ईशा रिखी आणि आसिफ खान (पंचायत फेम) यांसारखे प्रस्थापित चेहरे घरात दाखल झाले आहेत. तरुणाईचे प्रतिनिधित्व करत अरिश्फा खान, अमन गांधी, लव्ह गिल, रोहेद खान, गायक काझी अहमद तौकीर, रॅपर हर्ष मचारे (Yung DSA), गेमिंग स्टार तन्मय सिंह (ScoutOP) आणि कुशल तंवर (गुल्लू) हेदेखील या स्पर्धेत उतरले आहेत.

'वरदान' थीम आणि 'एक्स्ट्रा जीवन दान'चा ट्विस्ट

यंदा 'बिग बॉस २०'ची थीम 'वरदान' ही ठेवण्यात आली आहे. या संकल्पनेअंतर्गत स्पर्धकांना 'एक्स्ट्रा जीवन दान' (दोन लाईफलाईन्स) मिळणार असून, त्यामुळे खेळात कोणत्याही क्षणी अनपेक्षित वळण येऊ शकते. 'जिओ हॉटस्टार' आणि 'कलर्स टीव्ही'वर सुरू झालेल्या या सीझनमध्ये आता कोणते नवे वाद आणि मैत्रीचे बंध पाहायला मिळतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT