Bigg Boss 19 Pudhari
मनोरंजन

Big boss 19: फिनाले आधीच बिग बॉस विजेत्याची लिस्ट बाहेर? या सदस्याचे नाव आहे चर्चेत

शोच्या विजेत्यांची नावे मात्र फिनालेपूर्वीच लिक झाली आहेत

अमृता चौगुले

सलमान होस्ट करत असलेला रिअलिटी शो बिग बॉस सध्या चांगलाच चर्चेत आहे. टेलिव्हिजन आणि ओटीटी या दोन्ही माध्यमावर हा शो प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. वेळ जाईल तसा या शोचा ग्रँड फिनाले जवळ येतो आहे. पण या शोच्या विजेत्यांची नावे मात्र फिनालेपूर्वीच लिक झाली आहेत. (Latest Entertainment News)

एक वायरल होत असलेल्या पोस्टमधून हा खुलासा करण्यात आला आहे. या व्हायरल पोस्टमध्ये कोण सदस्य विजेता होणार, कोणता सदस्य कोणत्या नंबरवर विजयी होणार आणि कोणता सदस्य घरात किती दिवस राहणार याबाबत खुलासा करण्यात आला आहे. पाहुयात या व्हायरल पोस्टनुसार कोण कोण आहेत या विजेत्यांच्या यादीत

  • गौरव खन्ना : विजेता

  • अभिषेक बजाज : उपविजेता

  • फरहाना भट्ट (सेकंड रनर अप)

  •  अमाल मलिक (थर्ड रनर अप)

  •  तान्या मित्तल (4th रनर अप)

     याशिवाय अशनूर पाचव्या स्थानावर असल्याचे बोलले जात आहे. आता या यादीत कीती खरेपणा आहे हे फिनाले एपिसोडमध्येच समजेल. ही व्हायरल लिस्ट असल्याने याच्या सत्यतेची खात्री देता येत नाही.

बिग बॉसचा फिनाले पुढे गेला?

यापूर्वी फिनाले 7 डिसेंबरला होणार असे बोलले जात होते. पण या शोला एक्सटेन्शन मिळाले असून त्याचा फिनाले पुढे गेला आहे. आता हा फिनाले डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल.

घरात अजून दोन वाइल्ड कार्ड एंट्री होणार?

 बिग बॉसच्या घरात अजून डोन वाइल्ड कार्ड एंट्री होणार असे बोलले  जात आहे. यापूर्वी या घरात मालती चहर आणि शहबाज यांची एंट्री झाली होती.  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT