मुंबई - बिग बॉसच्या १९ व्या सीझनमध्ये उद्योजिका-सोशल मीडिया एन्फ्ल्युएन्सर तान्या मित्तलने जेव्हापासून घरात प्रवेश केला आहे. तेव्हापासून ती चर्चेत राहिलीय. सोशल मीडियावर तर तिच्या प्रत्येक बोलण्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. रोज नवे विषय आणि मोठ्या गोष्टींनी तिने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आतादेखील तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला आहे. शिवाय तिचा एक्स बॉयफ्रेंड घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊ शकतो, असे म्हटले जात आहे. दुसरीकडे, यावेळी विकेंड का वारमध्ये सलमान खान दिसमार नाही. त्या एपिसोडमध्ये दोन स्टार्स हजेरी लावणार आहेत.
रिपोर्टनुसार, तान्या मित्तलचा तथाकथित एक्स बॉयफ्रेंड बलराज सिंगने तिच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत, ज्यात तिला खोटे म्हटले आहे आणि केवळ कंटेंटसाठी तिने अध्यात्माचा वापर केल्याचा आरोप केला आहे. तथापि, या चर्चेला न जुमानता, बिग बॉस १९ मध्ये वाईल्ड-कार्ड स्पर्धक म्हणून तो एन्ट्री करणार असल्याची माहिती समोर आलाय. पण याबद्दल अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
बिग बॉस १९ मध्ये तान्या मित्तल पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. तिची लक्झरी लाईफ अध्यात्मिक जीवनशैलीपर्यंत आणि उद्योजिका असल्याने पहिल्या दिवसापासूनच ती घरता चर्चेत राहण्यात यशस्वी झाली आहे. तिच्याकडे १५० सिक्युरिटी गार्ड आहेत आणि तिच्या कपड्यांसाठी एक संपूर्ण घर आहे, असे सांगून ती वेळोवेळी प्रसिद्धीझोतात आलीय. तान्याने आता तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल बोलल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बिग बॉसच्या घरात तान्या मित्तलला एक्स बॉयफ्रेडची आठवण आली. ती म्हणाली, 'संपूर्ण देशात त्याच्यासारखा आमदार नाही.' तिचा तथाकथित बॉयफ्रेंड राजकीय फॅमिलीतून असल्याचे तिने म्हटले.
नवीन भागात शहबाज बदेशाने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यानंतर मजेशीर शायरींनी वातावरण हलके केले. दुसरीकड तान्या मित्तलही त्याच्यासोबत सामील झाली. तिने प्रेमावर एक शायरी वाचली, ज्यामुळे शहबाज तिला विचारू लागला की, ती अजूनही तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर प्रेम करते का? तान्याने खुलासा केला की, 'ती आतापर्यंत दोन रिलेशनशिपमध्ये आहे, परंतु आता तिच्या कोणत्याही एक्स बॉयफ्रेंडवर प्रेम करत नाही.'
या आठवड्याच्या शेवटी, बिग बॉस १९ मध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे. होस्ट सलमान खान त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे 'वीकेंड का वार' एपिसोड्स वगळणार आहे. त्याच्या जागी अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी स्टेजवर येतील. आत फॅन्स आणि प्रेक्षकांना दुप्पट विनोदाचा डोस मिळणार आहे.