Bigg Boss 19 latest updates
मुंबई - बिग बॉसच्या Latest Episode मध्ये जेव्हा तान्याने मृदुलचा ऑडियो ऐकला तेव्हा तिला अश्रूचा बांध फुटला. ती रडत असतानात जीशान म्हणाली की, ती मुलांपासून दूर राहते. कारण तिला आपल्या घरच्यांपासून भीती वाटते. सदस्यांना मुव्ही नाईटचे सरप्राईज मिळाल्यानंतर पहिल्या दो राऊंड्समध्ये त्यांनी चित्रपट गाण्यांवर डान्स केला. तिसऱ्या राऊंडमध्ये घरवाल्यांचे रिअल व्हिडिओ क्लिप्स प्ले करण्यात आले.
पहिल्या क्लिपमध्ये मृदुल तिवारी-गौरव खन्ना यांचा व्हिडिओ प्ले करण्यात आला. मृदुल, गौरवला म्हणतो- तान्या ‘फेक’ आहे आणि तिच्या बॉयफ्रेंड्सचा उल्लेख करतात. हे ऐकून तान्या रडायला लागते आणि मृदुलला म्हणते- 'तुम्हाला माझ्या बॉयफ्रेंड्स विषयी माहिती नाही. कुठलाही मित्र असे म्हणणार नाही. मी नेहमी मुलांपासून दूर राहते. मी स्पिरिचुअल आहे आणि मंदिरात जाते.'
तान्या जिशानला रडत रडत सांगते- टास्कनंतर तान्या, जीशान समोर रडायल लागते. ती जीशानला म्हणते- “मी स्वत: माझा बिझनेस उभारला आहे. लोक म्हणतात- खूप पुढे निघून गेलीय. पण कुणी सपोर्ट करत नाबी. मी खूप टॅलेंटेड आहे. पण कुणी साथ देत नाही. जेव्हा मी कॉलेज सोडून परक आले होते, तेव्हा सर्व नातेवाईकांनी हेच सांगितले होते की, बॉयफ्रेंडचा चक्कर असेल. मला भीती वाटते, यासाठी मी देखील मुलांपासून दूर राहते. कारण, जर घरचे पाहतील तर घरातून बाहेर करतील. आणि कुठलाही पाठिंबा मिळणार नाही.”
जीशान, तान्याला म्हणतो की, “मी आहे ना आता मी पाठिंबा देईन.”
तान्याने स्पष्ट केलं की, ज्या व्यक्तीने ही गोष्ट मृदुलला सांगितलीय, तो तिचा बॉयफ्रेंड कधीच नव्हता. तान्याला रडताना पाहून मृदुलने माफी मागितली.
जीशानने वातावरण हलके करण्यासाठी म्हटले की, घराबाहेरयेताच तान्याचे लग्न करुन देणार. इतकच नाही तर जीशानने तान्याला हेदेखील सांगितले की, जर तिने हो म्हटले तर तो त्या व्यक्तीला मार देईल.
तान्या बिग बॉसच्या घरात आल्यापासून रोज काही न काही ट्विस्ट येत आहेत. सुरुवातीपासूनच तान्या घरात मोठे-मोठे दावे करत आलीय. आताही तिने कॉफी विषयी एक स्टोरी सांगितली.
नीलम गिरीने तान्याला विचारलं की, तिचं कॉफी रूटीन काय आहे? यावर तान्या म्हणाली, 'येथील तर काही लोकांना माहिती नाही की, मी खूप डाऊन टू अर्थ होण्याचे नाटक करते. कॉफी पिण्यासाठी मी कुठे जाते हे माहिती आहे का? ग्वालियरहून आग्रा जाते. आग्रामधून कॉफी खरेदी करून पित नाही. ती कॉफी थंड असायला हवी. तर एक आईस बॉक्स सोबत ठेवते. कॉफी त्यात ठेवते. मग ताजमहलकडे जाते. आणि ताजमहलच्या मागे एक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये जो बेंच आहे, तिथे बसून कॉफी पिते.'