Bigg Boss 19 salman khan evicts farhana bhatt? Instagram
मनोरंजन

Bigg Boss 19: अपशब्दांचा पिटारा उघडला; सलमानने फरहाना भट्टला दाखवला बाहेरचा रस्ता?

Bigg Boss 19: अपशब्दांचा पिटारा उघडला; सलमानने फरहाना भट्टला दाखवला बाहेरचा रस्ता, होणार दोन एविक्शन

स्वालिया न. शिकलगार

‘बिग बॉस १९’मध्ये अपशब्द वापरल्यामुळे सलमान खानने स्पर्धक फरहाना भट्ट हिला घरातून बाहेर करणार असल्याचे म्हटले जात आहे. या आठवड्यात एक नाही तर दोन एविक्शन होणार असल्याचे वृत्त देखील आहे.

salman khan evicts farhana bhatt?

मुंबई - 'बिग बॉस १९' वीकेंड का वारमध्ये सलमान खानने फरहाना भट्टला घरातून बाहेर जाण्यासाठी सांगितलं आणि तिच्या अपशब्दांचा पिटारा उघडला. आया आठवड्यात अभिषेक बजाज आणि नीलम गिरी बाहेर जाण्याची शक्यता आहे.

'बिग बॉस १९' मध्ये आणखी एक जबरदस्त वीकेंड का वार एपिसोड होईल. रात्री एपिसोडच्या आधी रिलीज झालेल्या लेटेस्ट प्रमोशनल व्हिडिओमेध्ये होस्ट सलमान खानचा संताप अनेक कंटेस्टेंट्सवर निघणार आहे. तान्या मित्तलचे नॉमिनेशन, फरहाना भट्टला अमाल मलिकच्या विरोधात कामासाठी आणि नीलम गिरीला आपल्या मित्रांच्या बाबतीत वाईट बोलल्यामुळे ऐकवलं जाणार आहे. असेही वृत्त आहे की, या आठवड्यात एक नाही तर दोन एविक्शन होणार आहे.

वीकेंड का वारच्या पहिल्या टीजरमध्ये सलमानने कंटेस्टेंट नॉमिनेट करण्याच्या प्लॅन विषयी सांगितलं. सलमान खान म्हणाला, 'अब भैया से सैयां पे तो जा नहीं सकते' आणि दुसरीकडे हाऊसमेट्स विरोधात त्यांच्या गेमना एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यानंतर, सूत्रांनुसार, सलमान फरहाना भट्टला बोलावतो आणि पार्टिसिपेंट्स विरोधात त्याची अनेक वाईट गोष्टी वाचतो. तो म्हणतो की, नॅशनल टेलीव्हिजनवर अशा भाषेचा फ्रयोग करणं चांगलं नाही आणि ते त्याला भारी पडू शकतं. सलमान खान म्हणाला, 'मला खेद आहे की, मी गौरवचे शो पाहिले, माझ्या आईने पाहिले तर मी म्हणू शकतो की, तो एक सुपरस्टार आहे. तो प्रोडक्शन टीमला गेट उघडण्यासाठी आणि तिला बाहेर जाऊ देण्यासाठीही सांगतो.

आता या वीकेंड का वारमध्ये का घडेल, हे पाहणं रंजक ठरणार आहे. बिग बॉस १९ चा नवा वीकेंड का वार एपिसोड ८ नोव्हेंबर रोजी रात्री पाहता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT