bigg boss 19 Who Is Malti Chahar?
मुंबई - भारतीय क्रिकेटर आणि दीपक चाहरची बहिण मालती चाहर सध्या चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, 'बिग बॉस १९' च्या घरात दुसरे वाईल्डकार्ड कंटेस्टेंट म्हणून मालती चाहर एन्ट्री घेणार, असे म्हटले जात आहे. हा शो सलमान खान होस्ट करत आहे. मालती चाहर फेमिना मिस इंडिया फायनलिस्ट आहे. तिने चित्रपट आणि ओटीटीवर काम केले आहे. मालतीने अद्याप बिग बॉस १९ मध्ये आपल्या प्रवेशाबाबत कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. वाचा सविस्तर बातमी.
मालतीचा जन्म १५ नोव्हेंबर, १९९० रोजी आग्रामध्ये झाला. बालपणही आगरामध्ये गेले. केंद्रीय विद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर ती लखनऊमध्ये आली. तिथून बीटेक केलं. तिला आयएएस व्हायचं होतम. पण नंतर ग्लॅमरच्या दुनियेकडे वळली. तिने मॉडलिंग केले. अभिनयातही नसीबी आजमवले. तिला अनिल शर्मा दिग्दर्शित जीनियसमध्ये (२०१८) रॉ एजेंटची भूमिका मिळाली.
२०२२ मध्ये अरविंद पांडे दिग्दर्शित रोमँटिक ड्रामा 'इश्क पश्मीना'मध्ये अभिनय साकारला होता. अभिनयाशिवाय, मालतीने चित्रपट निर्मितीमध्ये रुची दाखवली. तिने लघु चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.
ती कंटेंट क्रिएटर आणि चित्रपट निर्माती देखील आहे. ती भारतीय क्रिकेटर दीपक चाहरची बहिण आहे. सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस लूकचे फोटोज पाहायला मिळताहेत.
मालती फेमिना मिस इंडिया २०१४ ची फायनालिस्ट होती. फेमिना मिस इंडिया दिल्ली २०१४ मध्ये मिस फोटोजेनिकचा किताब देखील तिने जिंकला होता. इथून तिच्या करिअरला सुरुवात झाली. या स्पर्धेने तिला मनोरंजन उद्योगाचे दरवाजे खुले करून दिले.
मालती चाहर सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे. ती आपले फोटो, व्हिडिओज, विविध कार्यक्रम, अपडेट्स पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे १ मिलियन हून अधिक फॉलोअर्स आहेत.