Tanya Mittal Bigg Boss 19 Malti Chahar-Tanya Mittal
मुंबई : बिग बॉस -१९ मध्ये मालती चाहरने को-कंटेस्टेंट तान्या मित्तल विरोधात धक्कादायक खुलासे केले आहेत. मालतीने आरोप केला आहे की, तान्या एडल्ट टॉयज विकते इतकचं नाही तर तिने तान्या मित्तलविषयी अन्य रहस्य देखील उघड केले आहेत, ते ऐकून घरच्यांचे डोळे विस्फारले आहेत.
बिग बॉस १९ या सिझनमध्ये प्रत्येक दिवस नवे वाद घेऊन येतोय. ताज्या एपिसोडमध्ये अभिनेत्री आणि स्पोर्ट्स अँकर मालती चाहरने को-कंटेस्टेंट तान्या मित्तलविषयी असे खुलासे केले की घरातील सदस्यच नव्हे, प्रेक्षक सुद्धा थक्क झाले.
बिग बॉस १९ च्या घरात प्रत्येक आठवड्याला घरच्या मंडळींमध्ये महायुद्ध होताना दिसते. मागील आठवड्यात फरहाना भट्टचे सर्वांशीच भांडण झाले होते. आणि आता नव्या आठवड्यात नवा ड्रामा पाहायला मिळेल. मालती चाहर को-कंटेस्टेंट तान्या मित्तलचे अने रहस्य उलगडताना दिसणार आहेत.
रिपोर्टनुसार, बिग बॉस घरात तान्या मित्तल - मालती चाहर यांच्या मध्ये मोठे भांडण होणार आहे. भांडणानंतर मालतीने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इतकचं नाही तर एक नवा प्रोमो देखील समोर आला आहे, ज्यामध्ये मालती घरच्यांच्या समोर तान्याचे रहस्य उलगडताना दिसत आहे.
मालती चाहरने तान्याविषयी बोलताना म्हटलं, “ती फक्त ग्लॅमरस नाही, तर एडल्ट टॉयज विकते.” एवढंच नाही तर तिने तान्या मित्तलच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित काही रहस्येही उघड केली. मालतीचे हे वक्तव्य ऐकून घरच्यांचे डोळे विस्फारले आणि काही सदस्यांनी तत्काळ या विषयावर प्रतिक्रिया दिली.
प्रोमोमध्ये मालती चाहर अभिषेक बजाज सह अन्य घरच्यांसमोर तान्या मित्तल विषयी खुलासा करते की, ती सती सावित्री नाही. ती म्हणाली, "तान्या मित्तल सति सावित्री बनते ना. घराच्या आत लोक काय विचार करतात तिच्याबद्दल." अभिषेक उत्तरात म्हटले की, ती साडी नेसते, ती खूप संस्कारी आहे.
यावर मालती म्हणते, "तुम्हाला फक्त केवळ एक बाजू माहितीये, दुसरी बाजू नाही. ती ज्या प्रकारे स्वत: ला दाखवते, खरंतर ती अगदी वेगळी आहे. मिनी स्कर्ट्समध्येही व्हिडिओ आहेत तिचे. अलिकडच्या रील्स तर असे होते की, तिने पेटीकोट घातला आहे, आणि ब्लाऊज नाही." आश्चर्य व्यक्त करत अभिषेक म्हणाला की, हे तर वेगळेच आहे. मालती पुढे म्हणते, समजत आहे की, ती मीम मटेरियल का आहे. म्हणते काही वेगळं आणि करते काही वेगळं. ती प्लेयर आहे.
मालती चाहरच्या अशा विधानांमुळे ती सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. लोकांचे मानणे आहे की, ती तान्याचे चारित्र्य जज करत आहे. इतकचं नाही तर काही जण तान्याचे समर्थन करत आहेत.