बिग बॉस १९ मधून बाहेर आल्यानंतर मालती चाहरने प्रणित मोरेविरोधात धक्कादायक खुलासे केले. त्याची वागणूक बदलल्यामुळे तिने त्याला निरोप दिला नसल्याचे सांगितले.
audience shocked when malti did not met pranit more
बिग बॉस १९ च्या फिनाले मधून एविक्शन झाल्यानंतर मालती चाहरने मोठे खुलासा केला आहे. प्रणित मोरे असो वा फरहाना भट्ट, मालतीने सर्व गोष्टी उघड केल्या. एवढे दिवस घरात एकत्र असले तरी बाहेर पडताना मालतीने स्पर्धक प्रणित मोरेला निरोपसुद्धा दिला नाही. यामागचं कारण आता तिने उघडपणे सांगितलं आहे. मालतीने एका मुलाखतीत सांगितले, “घरात असताना प्रणितची वागणूक अचानकपणे बदलली होती. पहिल्या काही आठवड्यांमध्ये आम्ही चांगले मित्र होतो. पण नंतर त्याने चुकीचे समज करून घेतले. मी मनाई केली असताना देखील थट्टा केली. घरात झालेल्या या घडामोडींवर आता मालतीने माध्यमांशी संवाद साधला. या सर्व प्रकरणांवर ती काय म्हणाली?
काय म्हणाली मालती चाहर?
जे काही शेवटच्या दिवसात घडलं, ते मला अजिबात आवडलं नाही, तुम्ही पाहिलं असेल. प्रणित मोरे माझी थट्टा करत होता. तो माझ्या चेहऱ्यावरून थट्टा केली. त्याला स्वत:ला माझ्याशी भांडायचं होतं. मला भांडायचं नव्हतं. मी ज्या दोन लोकांना मी मित्र मानले होते, तिच लोक मला शेवटी मनाई करून देखील थट्टा करत होते. आणि म्हणूनच मालतीने प्रणित मोरेला आलिंगन देऊन बिग बॉसच्या घरात भेट घेतली नाही आणि निरोपही घेतला नाही. पण हे पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला.
मी २४ तास तिथे आहे. आणि मी ते पाहत आहे की, तिथे काय घडत आहे. आणि ते सातत्याने होत होतं. प्रणित मोरे जे काही बोलत, घरातील लोक माझ्याविषयी बोलत आहेत..मला लेस्बियन बोलत आहे, शिव्या देत आहेत, मला लाथ मारून जात आहेत. सगळे सिम्पथी कार्ड खेळत आहेत. भांडणे कुणाचेही असोत दु:खी तान्या होते, ही सर्वात मोठी बाब होती, असे तिने मिश्किलपणे सांगितले.
ती कोणाशी मैत्री टिकवेल, फिनालेनंतर कोणत्या स्पर्धकाला भेटायला आवडेल, यावर मालती म्हणाली, बिग बॉसच्या बाहेर आल्यानंतर आता मी सावरत आहे. जेव्हा तुम्ही बिग बॉसच्या घरात मैत्री नाभावू शकत तर बाहेर काय निभावणार, असे मत देखील मांडले.
फरहाना भट्टने जे म्हटलं मालती विषयी की, मालती भिक मागून एन्ट्री घेतलीय. यावर सिस्टरवाला बॉन्ड तर अजिबात नव्हता, आमच्यात असे मालतीने स्पष्ट केले. फरहाना माझ्यावर लक्ष ठेवून असायची. मी काम करते की ही ती फॉलो करायची, असेही तिने मत मांडले.
फॅमिली विकमध्ये मालतीचे वडील गेले नाहीत. यावर बोलताना ती म्हणाली, वडिलांनी मला एकदेखी प्रश्न विचारला नाही. माझी भाषा खराब नाही. माझे वडील कॅमेरासमोर बोलायला लाजतात. पण वडिलांनी स्टेटमेंट दिल्यानंतर ते हेडिंग बनले. मी घरापासून १६ वर्षा दूर आहे. माझ्या वडिलांनी वाटलं होतं की, मी बिग बॉसच्या घरात टिकेल की नाही. पण मालतीचा गेम पाहून वडिलांना विश्वास झाला.
तान्याने अमालला केलं किस?
मालतीने दावा केला की, तिने स्वत: पाहिलं होतं की, तान्याने अमालला किस केलं होतं., हे खरं आहे. ती पुढे म्हणते-माझ्या स्वभावात नाहीये की मी शिवाय देईन. जो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत आहे, तो खरंच फेकू आहे. मी वाद देखील घातला आहे, जे सत्य आहे ते सत्य आहे. आपला स्वभाव हाच गेम आहे, असे तिचे म्हणणे आहे. सध्या गेमचेंजर, धाकड गर्ल, वर्कआऊट असे टॅग मालतीसाठी व्हायरल झाले आहेत.