पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १८ शोमध्ये हॉलीवूड स्टार कार्दशियन सिस्टर्सची एन्ट्री होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, वाईल्ड कार्ड कंटेस्टेंट शोमध्ये एन्ट्री करणार आहे. त्यासाठी निर्मात्यांनी कार्दशियन सिस्टर्स यांना ॲप्रोच केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, गेस्ट म्हणून की कंटेस्टेंट्स म्हणून या सिस्टर्स एन्ट्री करणार, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. कार्दशियन सिस्टर्सची डिसेंबरमध्ये एन्ट्री घेऊ शकतात, अशी माहिती समजते.
कार्दशियन सिस्टर्स म्हणजेच किम कार्दशियन, कोर्टनी कार्दशियन आणि ख्लो कार्दशियन आहेत. या तिन्ही बहिणी इंटरनॅशनल स्टार्स आहेत. पण तिन्ही बहिणींपैकी दोघी शोमध्ये येतील, असे म्हटले जात आहे. अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कार्दशियन सिस्टर्स उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, बिग बॉस शोमध्ये वाईल्ड कार्ड कंटेस्टेंट दिग्विजय राठी आणि कशिश कपूर यांनी एन्ट्री घेतली आहे.