tejaswi prakash and karan kundrra  
मनोरंजन

BB15 : तेजस्वी प्रकाश हिने करण कुंद्राला रोमँटिक अंदाजात … (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

बिग बॉस १५ मध्ये सध्या चर्चा सुरू आहे ती तेजस्वी प्रकाश-करण यांची. तेजस्वी प्रकाश-करण कुंद्रा यांच्या नात्यात उतार-चढ पाहायला मिळत आहेत. प्रत्येक आठवड्याच्या स्पेशल एपिसोडमध्ये करण कुंद्राला बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानकडून काही सल्ले मिळत आहेत. यानंतर त्यांच्या नात्यात तणाव तर कधी प्रेम पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांत एपिसोडमध्ये असं काहीतरी पहायला मिळालं की, त्याची चर्चा होऊ लागली आहे.

मागील एपिसोडची सुरुवात कुंद्रा-प्रकाश यांच्या वादाने झाली होती. यामध्ये तिला कुंद्रा आणि शमिता शेट्टीशी मैत्री खटकत होती. तर कुंद्राला प्रकाश आणि निशांत भटची मैत्री खटकत होती.

पण, पुढे त्यांच्यात प्रेम वाढताना दिसलं. हे कपल व्हीआयपी रुममध्ये जातात. येथे ते रोमँटिक अंदाजात दिसतात. ती कुंद्राजवळ आपलं प्रेम व्यक्त करते. प्रकाश कुंद्राला प्रेमाने सांगते-आतापर्यंत ती त्याला चांगल्या पध्दतीने समजवू शकलेली नाही की, तो तिच्यासाठी किती महत्वाचा आहे. त्यामुळेच या दोघांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत.

प्रकाश म्हणते की, तो तिच्या आयुष्यात आल्याने स्वत:ला खूप लकी मानते. प्रकाश आणि कुंद्राची रोमँटिक केमिस्ट्री फॅन्सना भूरळ घालतेय. यावेळी प्रकाश-कुंद्राला रोमँटिक अंदाजात किस करतात.

शमिताने केलं VIP झोनमधून बाहेर

शमिता शेट्टी घराची नवी कॅप्टन झालीय. बिग बॉसने तिला एक व्हीआयपी कंटेस्टेंट्सला डाउनग्रेड करण्याचा अधिकार दिला. शमिताने तिला व्हिआयपी झोनमधून बाहेर केलं.

बिग बॉसवर आरोप

शमिताने प्रकाशला व्हिआयपी झोनमधून बाहेर केल्यानंतर तेजस्वी सर्वात आधी बिग बॉसवर आपली भडास काढली. तिने बिग बॉसवर शमिताला फेवर करण्याचा आरोप केला. प्रकाश म्हणाली, बिग बॉसला वाटतं की, प्रत्येक जण शमिताची बाजू घ्यावी.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT