Bhuvan Bam The Revolutionaries new series
मुंबई - ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेजॉन प्राईम व्हिडिओवर नव्या वेब सीरीजची घोषणा करण्यात आलीय. 'द रिवोल्यूशनरीज' असे सीरीजचे नाव असून त्यात स्वातंत्र्याची क्रांतीची कहानी पाहायला मिळेल. या सीरीजमध्ये 'मिसमॅच्ड' अभिनेते रोहित सराफ मुख्य भूमिकेत आहेत. तर यूट्यूबर आणि अभिनेता भुवन बाम देखील महत्त्वाच्या भूमित आहे. एक्स अकाऊंटवर सध्या भूवन बाम ट्रेंडवर आहे. या सीरीजमध्ये 'लापता लेडीज' फेम अभिनेत्री प्रतिभा रांटा देखील दिसणार आहे.
निखिल आडवाणी दिग्दर्शित 'द रिवोल्यूशनरीज'ची कहाणी संजीव सान्यालचे पुस्तक 'रिवोल्यूशनरीज: द अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वॉन इट्स फ्रीडम'वर आधारित आहे. या सीरीजमध्ये गुरफतेह पीराजादा आणि जेसन शाह देखील अभिनय साकारताना दिसली. आता 'द रिवोल्यूशनरीज'ची पहिली झलक समोर आली आहे, यामद्ये तमाम स्टार्सची झलक दिसतेय. 'द रिवोल्यूशनरीज' पुढील वर्षी ॲमेजॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज केलं जाईल. प्रीमियर २०२६ मध्ये भारत सहित २४० हून अधिक देश आणि क्षेत्रांमध्ये प्राईम व्हिडिओवर केलं जाईल.
आगामी पीरियड ड्रामा 'द रेवोल्यूशनरीज'चा फर्स्ट लूक व्हिडिओ ५६ सेकंदाचा आहे. सध्या या सीरीजचे शूटिंग सुरु आहे. मुंबई, अमृतसर, वाराणसी, डेहरादून, अन्य शहरांत शूट केले जात आहे.