मनोरंजन

Bhumi Pednekar: भटक्या कुत्र्यांसाठी भूमी पेडणेकर मैदानात; ऋग्वेद, महाभारताचा दिला दाखला

तीने पाळीव श्वान ब्रूनो याच्या संदर्भात पोस्ट केली आहे

अमृता चौगुले

  • सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांबाबत दिलेल्या निर्णयावरून भूमी पेडणेकरची पोस्ट

  • पोस्टमध्ये भटकी कुत्री आणि त्यांना खाऊ घालणारे यांची केली पाठराखण

  • ऋग्वेद, महाभारत काळापासून श्वानसोबत असल्याचे म्हणणे

अलीकडेच दिल्ली एनसीआरमध्ये भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले पाहून हाय कोर्टाने कठोर भूमिका घेत आठ आठवड्यांच्या आत सर्व भटके कुत्रे निवासी वस्त्यांपासून लांब नेऊन एका शेल्टरमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावर अनेक सेलिब्रिटी नाराजी व्यक्त करत आहेत तर अनेक त्याबाबत सोशल मीडियावर उघड पोस्ट करत आहेत. (Latest Entertainment News)

‘बधाई दो' फेम अभिनेत्री भूमी पेडणेकरनही या संदर्भात एक पोस्ट केली आहे. यामध्ये तीने पाळीव श्वान ब्रूनो याच्या संदर्भात पोस्ट केली आहे. यामध्ये तीने त्याच्या रेस्क्यूपासून ते त्याच्यासोबतच्या बॉंडिंगबाबत शेयर केले आहे.

या पोस्टमध्ये ती म्हणते, 'आमच्या आयुष्यात ब्रुनो बाबा आला, तेव्हा तो फक्त 4 महिन्यांचा होता. @yodamumbai च्या टीमला तो सापडला. अत्यंत जखमी अवस्थेत तो सापडला होता. त्याचा जबडा निखळलेला होता, शेपटी भाजलेली होती. पण तरीही त्याची त्याची जिद्द एका योद्ध्यासारखी होती.

ब्रूनो ची ही अवस्था लहान मुलांनी केली होती. ज्यांना निष्पाप, मुक्या जीवाचा छळ करण्यात आनंद वाटत होता. मुले असे वागण्यामागे त्यांना आपण चांगले संस्कार देण्यात किंवा संवेदनशिलता रुजवण्यात कमी पडलो आहे.

माननीय हाय कोर्टाच्या दिल्लीतील 3,00,000 कुत्र्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याचे आदेशामुळे, मला ब्रुनो आणि त्या सर्व श्वानांचा विचार मनात येतो आहे ज्यांच्यासाठी रस्ता हेच घर आहे.

अनेक दशके रस्त्यांवरील कुत्र्यांना खाऊ घालणारे लोक, त्यांची काळजी घेणारे स्वतच्या खर्चातून त्यांच्यावर उपचार करतात. श्वानांना आरोपी ठरवण्याआधी किंवा त्यांची काळजी घेणाऱ्यांना शिक्षा करण्यापेक्षा आपण एक सिस्टम करू ज्यामध्ये, मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण मोहीम. नियमित लसीकरण कार्यक्रम. योग्य आहार आणि देखरेख हे करता येईल.

इंडियन परीह प्रजाती 4,500 वर्षांपासून आपल्या सोबत आहे. ते आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संस्कृतीचा भाग आहेत. त्यांना मूळ प्रवाहापासून बाजूला करणे हा त्या समस्येचा उपाय नाही. याने क्रूरता निर्माण होईल.

ती सध्या काय करते?

  • भूमी अलिकेच नेटफ्लिक्सच्या ' द रॉयल्स' या वेबसिरिजमध्ये दिसली होती.

  • याशिवाय ती आगामी मेरे हसबंड की बिवी या सिनेमात दिसली होती

  • या सिनेमात तिच्या शिवाय रकुलप्रीत सिंग, हर्ष गुजराल, अर्जुन कपूर, दिनो मोरीया हे कलाकार होते

  • हा सिनेमा जिओ हॉटस्टारवर पाहता येईल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT